सत्ता बदलली म्हणून काय, अध्यक्षपद सोडणार नाही!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे वक्तव्य
Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik News
Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik NewsSarkarnama

नाशिक : राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी (Womens) हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी पक्षातील (NCP) पद सोडले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) जाऊन नवीन सरकार स्थापन झाले असले तरी आयोगाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज येथे सांगितले. (Womens commission Chairmen Rupali will not leave the post)

Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik News
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

नाशिक शहर-जिल्ह्यातील महिला सुरक्षिततेसंदर्भातील आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर मंगळवारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय सत्तांतरावर आपले मत व्यक्त केले.(Rupali Chakankar News in Marathi)

Rupali Chakankar News, Political News updates, Rajkiya Batmya, Nashik News
संजय शिरसाठ म्हणाले, `आता फक्त एकनाथ शिंदे हेच नेते`

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक आहे. त्यामुळे या पदावर येण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत होते. पद स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादीतील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात, त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडून न्याय देण्यासंदर्भात आयोगाकडून काम केले जाईल. राज्यातील बदलत्या सत्ताकारणामुळे पद सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे ठाम मत आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्यासंदर्भातील तक्रार आयोगाकडे आली असता आयोगाच्या आदेशानंतर सानपाडा पोलिस ठाण्यात आमदार नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात आमदार नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहितीही श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com