
Dhule Maratha Reservation News : मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने नेहमीच आश्वासनांचे गाजर दाखविले आहे. त्यामुळे धुळे येथे संतप्त समाज बांधवांनी तीव्र घोषणा देत आंदोलन केले. (State Government should take decision immediatly on Maratha reservation)
धुळे (Dhule) शहरात मराठा (Maratha) समाज बांधवांनी राज्य सरकारच्या (Maharashtra Government) उदासीनतेच्या निषेधार्थ आंदोलन केले. या वेळी गाजर दाखवून घोषणा देण्यात आल्या.
धुळे शहरात आंदोलन करण्यात आले. या वेळी राजवर्धन कदमबांडे यांनीदेखील त्याला पाठिंबा दिला. मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. आरक्षणाचे गाजर दाखविणाऱ्या सरकारविरोधात शनिवारी मराठा आंदोलकांनी राज्य सरकारला गाजर दाखवत आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आरक्षणाची मागणी केली.
मराठा समाजाला सरकारने आरक्षणापासून लांब ठेवले आहे. मराठा समाजाने राज्यात ५६ मूक मोर्चे काढले. आरक्षण मागणीसाठी ३५ युवकांनी आत्महत्या केल्या. मात्र, राज्य सरकारने प्रत्येकवेळी समाजाला आरक्षणाचे आश्वासन देत गाजर दाखवले. आताही तीच स्थिती आहे.
आता सरकारकडून फसवणूक पुरे झाली. आता समाजाला सरकारने फक्त गाजर दाखवू नये, तर घटनात्मकदृष्ट्या टिकणारे आरक्षण द्यावे. आम्हाला गाजर दाखवू नका, असा सूचक इशारा देत मराठा समाजाने सरकारचा निषेध नोंदवला.
या वेळी सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, राजाराम पाटील, सुनील महाले, भोला वाघ, विनोद जगताप, मनोज ढवळे, जगन ताकटे, निंबा मराठे, दीपक रौंदळ, हेमंत भडक, संदीप पाटील, संदीप पाटोळे, अमोल पाटील, वीरेंद्र मोरे, राजेंद्र सरोदे, कैलास वाघारे, श्याम निरगुडे, संदीप सूर्यवंशी, मच्छिंद्र निकम, सचिन मराठे आदी सहभागी झाले.
कदमबांडे यांचा पाठिंबा
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी शनिवारी क्युमाइन क्लबजवळ सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. भानुदास बगदे, मुन्ना शितोळे, संजय पाटील, लहू पाटील, राजेंद्र काळे, राजेंद्र सरोदे आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.