Vinayak Mete: मराठा समाजासाठी लढणारे नेतृत्व हरपले!

धुळे येथे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी श्रद्धांजली सभा झाली.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

धुळे : मराठा (Maratha) समाजाच्या आरक्षणासह (Reservation) समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) सातत्याने लढणारा झुंजार लढवय्या नेता काळाने हिरावून नेला अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Tribute meeting for Vinayak mete in Dhule)

Vinayak Mete
Nashik News: टोलसाठी पोलिस अधीक्षकांचा ताफाच अडवला!

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्‍नांवर लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा माजी आमदार विनायकराव मेटे यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा झाली.

Vinayak Mete
Shivsena: आदित्य ठाकरेंच्या स्वागतार्थ पाचोरा मतदारसंघ सजला

जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, मनपा स्थायी समिती सभापती शीतल नवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक प्रकाश पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

विनायकराव मेटे व तसेच एका अपघातात निधन झालेल्या धुळे शहरातील मराठा समाजाचे युवक राजू वाघारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मेटे यांनी संघर्षातून आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मराठा समाजाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी एस. एम. पाटील, सुधाकर बेंद्रे, शिवाजीराव मराठे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, महापौर श्री. कर्पे, श्री. भोसले, साहेबराव देसाई, राजेंद्र जाधव, प्रा. श्री. पाटील, हिलाल माळी, मराठा क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत मांडले. दोंडाईचा येथील नगरसेवक विजय मराठे, संदीप पाटोळे, विजय देवकर, नगरसेवक राजेश पवार आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com