
Dhule Maratha agitation : मराठा समाजाने आरक्षण मागीतले की, अनेक संघटना राजकारण्यांच्या इशाऱ्यावरून त्याला विरोध करण्यासाठी पुढे येतात. याचा खेद वाटतो. राज्यातील सर्व मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे, त्यात कोणताही अन्य पर्याय स्वीकारला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. (Maratha community & followers agitation at Chalisgaon squre in Dhule)
आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज बांधव काल मोठ्या संख्येने महामार्गावर उतरले होते. त्यांनी चाळीसगाव चौफुलीवर चक्काजाम करीत रास्ता रोको केला.
आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. त्यांच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाला विनाअटी-शर्ती आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांनी मागणी केली.
जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत आरक्षणासाठी मराठा समाजातर्फे चाळीसगाव रोड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन झाले. त्यामुळे दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, निंबा मराठे, भानुदास बगदे, अतुल सोनवणे, भोला वाघ, गोविंद वाघ, राजेंद्र ढवळे, प्रदीप जाधव, वाल्मीक मराठे, विकास बाबर, साहेबराव देसाई, मनोज ढवळे, नैनेश साळुंखे, विनोद जगताप, भय्या शिंदे, नाना कदम, जितू इखे, अशोक सुडके, सचिन मराठे, अनिल बगदे, आबा कदम, कैलास मराठे, अशोक तोटे, विक्रम काळे, जगन ताकटे, संजय गायकवाड, वामन मोहिते, मुन्ना मराठे, हनुमंत अवताडे, शुभांगी पाटील, अर्जुन पाटील, शैलेश मराठे आदी आंदोलनात सहभागी झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.