Maratha Reservation : भुजबळांच्या मतदारसंघात येवला बंदचा इशारा!

Maratha community given memorandum for reservation in yeola-सकल मराठा समाजातर्फे येवल्यात घोषणाबाजी करत निवेदन, सोमवारपासून तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
Maratha delegation at yeola
Maratha delegation at yeolaSarkarnama

Yeola Maratah News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील सकल मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भाचत येत्या रविवारी (ता.१७) शहर व तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. (Yeola city and taluka will remain close on 17th septeber)

यासंदर्भात सकल मराठा (Maratha) समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना (Maharashtra) निवेदन दिले आहे. आरक्षणाची मागणी मान्य करावी यासाठी येत्या रविवारी येवला (Yeola) बंद पाळला जाणार आहे.

Maratha delegation at yeola
Niphad Maratha News : सरणावरील उपोषणकर्त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा!

मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची मागणी पूर्ण करून समाजाला न्याय द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजातर्फे रविवारी बंद पुकारण्यात येणार आहे. तहसीलदार कार्यालयापुढे रोज ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने येथील सकल मराठा समाजही आता सक्रिय होऊ लागला आहे. तहसील कार्यालयात काही वेळ ठिय्या देत घोषणा देण्यात आली.

Maratha delegation at yeola
CM Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्री शिंदे स्वत: मनोज जरांगेंचे उपोषण सोडवणार |Manoj Jarange|

समाज शांततेच्या मार्गाने आपला हक्क मागत असतानाही शासन दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. शांततेच्या मार्गानेच येथे आंदोलन केले जाईल, असे संजय सोमासे यांनी या वेळी सांगितले.

मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पूर्ण करावे, राजापूर येथील राजे शिवछत्रपती शिवरायांचा बंदिस्त असलेला पुतळा माना-सन्मानाने पुन्हा त्याच ठिकाणी बसवावा, महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी घोषित करावे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजावर गुन्हे दाखल केले आहेत, त्याचे चार्जशीट दाखल करू नये, शहरात २००५ पासून मागणी केलेली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसृष्टीचे काम १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Maratha delegation at yeola
Malegaon Politics : मालेगावातही घडू पाहतेय एक नवे ‘पवना’ प्रकरण?

निवेदन देतेवेळी संजय सोमासे, निंबाजी फरताळे, प्रशांत आरखडे, चंद्रमोहन मोरे, गणेश सोमासे, प्रफुल्ल गायकवाड, रामनाथ ढोमसे, गोरख संत, गोरख कोटमे, नितीन जाधव, योगेश शिरगुळे, राजेंद्र लभडे, उत्तम घुले, मारुती खैरनार, चंद्रभान बोळीज, अर्जुन बोळीज आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in