मराठा समाजात छगन भुजबळांसारखे नेते नाहीत याचं वाईट वाटतंय!

योगेश केदार यांनी मराठा आऱक्षण विषयावर छगन भुजबळ यांची भेट घेतली
मराठा समाजात छगन भुजबळांसारखे नेते नाहीत याचं वाईट वाटतंय!
Yogesh Kedar & Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : मराठा (Maratha Reservation) समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे केली. श्री. भुजबळ यांनी ओबीसी (OBC) समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला हात लावता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. (Maratha community should get Reservation from OBC)

Yogesh Kedar & Chhagan Bhujbal
महिला आरक्षणाने भाजप महापौर सतीश कुलकर्णींची दांडी उडाली!

यासंदर्भात श्री. केदार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आज आम्ही श्री. भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी आरक्षणावर चर्चा केली. मात्र श्री. भुजबळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिशय ठाम व आक्रमक होते. त्यांनी अतिशय परखडपणे आपली भूमिका मांडली, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर अन्य नेते तशी भूमिका मांडताना दिसत नाहीत.

Yogesh Kedar & Chhagan Bhujbal
शिवसेनेच्या १४ नगरसेवकांची शिवसंपर्क अभियानाला दांडी!

ते पुढे म्हणाले, सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील आरक्षणातून आरक्षण देण्याचा विचार व्हावा. त्याबाबत अन्य घटकांनी सहकार्य करावे. सहानुभूतीने विचार करावा, असे सांगितले. मात्र श्री. भुजबळ यांनी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देताच येणार नाही. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण सोडून बाहेरचा विचार करा, असे सांगितले.

आपण मराठा समाजाची बाजू समजावून घेतली पाहिजे.. यासाठी आम्ही चर्चा केली. ओबीसी घटक आमच्या हक्काचे १४ टक्के अधिक आरक्षण घेतो आहे. मराठा समाजाने मनाचा मोठेपणा दाखवला, मात्र ओबीसी घटकांनी चर्चेची दारे बंद करून घेतली. मराठा समाजात भुजबळ यांच्यासारखे आमदार, खासदार नाहीत याच वाईट वाटतंय, असे केदार म्हणाले.

यासंदर्भात आता आम्ही महाराष्ट्रात जनजागृती करणार आहोत. सगळ्या नेत्यांना भेटून हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही तेच केले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ही भेट घेतली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in