Nashik News: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जाळले, तिघांना जन्मठेपेची शिक्षा

अकरा वर्षांपूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत पेट्रोल विक्रेत्यांनी जाळले होते.
Illegal Fuel sale case
Illegal Fuel sale caseSarkarnama

नाशिक : अवैध पेट्रोल (Illegal Fuel) विक्री तपासणीसाठी गेलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी (Collector) वाद घालून कामकाजात अडथळा आणला. यावेळी अधिकाऱ्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना जाळण्यात आले. या गंभीर व खळबळजनक म्हणून राज्यभर (Maharashtra) चर्चा झालेल्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने (District court) तिघांना जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली. अकरा वर्षांनी खटल्याचा निकाल आज देण्यात आला. (widly discussed case of Malegaon Upper collector burning case accused get life imprisonment today)

Illegal Fuel sale case
Shocking...पोलिस मुख्यालय नव्हे... हा तर ‘सरकारचे जावई पोसण्याचा अड्डा!

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (Yashwant Sonwane) जळीत हात्यकांडचा आज निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाचे न्यायमूर्ती डी वाय गोंड यांनी तीन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Illegal Fuel sale case
आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्यामागे फार मोठे षडयंत्र!

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र सुरवडकर, राजू सिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम ३०२ अंतर्गत आजीवन करावास,३५३ अंतर्गत २ वर्षे आणि कलम ५०६ अंतर्गत ७ वर्षे शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाड पासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले असता इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता.

दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिंद्र सुरवडकर,राजू सिरसाट,अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पांच आरोपी होते त्यापैकी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला आहे तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात खटला सुरु आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com