उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढून आमदार मंजुळा गावित गुवाहाटीत गेल्या.
Manjula Gavit News in Marathi, Eknath Shinde Latest Updates, Dhule NewsSarkarnama

उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढून आमदार मंजुळा गावित गुवाहाटीत गेल्या.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत व्हाया सुरत ‘शिंदे’ गटात दाखल झाल्या.

साक्री : राज्यात (Maharashtra) सुरू असलेल्या सत्तेच्या पेचप्रसंगात शिवसेनेचे (Shivsena) एक एक आमदार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत जात आहे. साक्रीच्या (Dhule) अपक्ष आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांनी काल उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thakrey) फोटो काढला होता. शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यादेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटीत पोचल्या आहेत. (Sakri (Dhule) MLA Manjula Gavit joins Eknath Shinde Group)

Manjula Gavit News in Marathi, Eknath Shinde Latest Updates, Dhule News
शिंदे असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत व पती, शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित यांच्यासह त्या व्हाया ‘सुरत’ बुधवारी गुवाहाटीत दाखल झाल्या. काल उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्या आमदार गावित आज अचानक श्री. शिंदे यांच्यासोबत गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(Manjula Gavit News in Marathi)

Manjula Gavit News in Marathi, Eknath Shinde Latest Updates, Dhule News
उद्धव ठाकरे पुन्हा 'वर्षा'ची पायरी चढणार नाहीत...

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे बंड झाले. शिवसेनानेते शिंदे काही आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले. त्यानंतर ते आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची भूमिका मंडली आहे. यात त्यांना शिवसेनेच्या ३० ते ३५ आमदारांचा देखील पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. यातच आता आणखीन काही आमदार त्यांना साथ देत असल्याचे दिसून येत असून, आज पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह साक्रीच्या आमदार मंजुळा गावित देखील श्री. शिंदे यांच्या गटात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, आमदार गावित या शिंदे गटात जात असल्याच्या बातम्या कालपासून येत असताना शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी मात्र याचे खंडन करत त्या शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबतचे छायाचित्र देखील त्यांनी प्रसिद्ध केले होते. मात्र आज आमदार गावित यांनी संपर्कप्रमुख थोरात यांच्या दाव्याला छेद देत थेट गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आम्ही शिवसेनेतच, परंतु एकनाथ शिंदे यांच्या सोबत

आमदार मंजुळा गावित गुवाहाटीत दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण शिवसेनेतच असून, यापुढे देखील शिवसेनेत राहू. मात्र तूर्तास एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. कालपासून मुख्यमंत्री ठाकरे, तसेच श्री. शिंदे यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. तसेच भाजपकडूनदेखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार रावल यांनी देखील आपणास संपर्क साधला आहे. मात्र आपण सध्या अन्य आमदारांसह श्री. शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, श्री. शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in