Nashik News, बनकर, कोकाटे यांना लॅाटरी लागली, मात्र घरचे आव्हान पेलवणार का?

जिल्हा परिषद निवडणूकीत सिमंतीनी कोकाट यांना चुलती भारती कोकाटेंचेच मोठे आव्हान
Manikrao Kokate & Dilip Bankar
Manikrao Kokate & Dilip BankarSarkarnama

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गटाची आरक्षण (ZP Reservation) सोडत आज झाली. त्यात आदिवासी (Trible) तालुक्यांत सर्वसाधारण तर सर्वसाधारण (General) तालुक्यांत आदिवासी आरक्षण निघाले. त्यामुळे अनेक प्रस्थापितांचे राजकारणच संपुष्टात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) नशिबवान ठरले. सोमठाणे गट महिला आरक्षीत झाल्याने सिमंतीनी कोकाटे यांना संधी मिळणार आहे. (Manikrao Kokate`s daughter Simantini gat being Womens reserve)

Manikrao Kokate & Dilip Bankar
एकनाथ शिंदे मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का?

जिल्ह्यात ७३ गट होते. त्यात ११ नवे गट झाल्याने ८४ गट झाले. त्यात देवळा, येवला, इगतपुरी वगळता अन्य तालुक्यांत प्रत्येकी एक गट वाढला आहे. याशिवाय विविध गटांची पुर्नरचना झाली. सिन्नरला पूर्वी देवपूर, नांदूर शिंगोटे, चास, नायगाव, मुसळगाव आणि ठाणगाव असे सहा गट होते. त्यात एक गट वाढला. नायगाव, चास, देवपूर हे तीन गट अन्य गटांत विसर्जीत झाले. नव्याने झालेल्या रचनेत माळेगाव, सोमठाणे, पांगरी, दापूर, शिवडे, नांदूर शिंगोटे व मुसळगाव असे सात गट झाले आहेत.

Manikrao Kokate & Dilip Bankar
Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

आरक्षणाच्या आजच्या सोडतीत अनेक प्रस्थापित नेत्यांना निवडणुकीचा मार्ग बंद झाला. नांदगाव तालुक्यात सर्व चार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्वीन आहेर यांचा गट राखीव झाला. निफाडमध्ये दहा पैकी दोन गट महिला राखील तर उर्वरीत सर्व आठ जागा अनिसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. त्याचा फटका गेल्या निवडणूकीत सर्वाधीक मतांनी विजयी झालेल्या आर्कीटेक्ट अमृता पवार व चांदोरीचे सिद्धार्थ वनारसे यांना बसला आहे. अशा अनेक नेत्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. पिंपळगाव बसवंत हा गट महिला राखीव असल्याने आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी या सदस्या आहेत. त्यांना संधी मिळणार आहे.

कोकाटे यांना लॅाटरी

देवठाण गटातून सिमंतीनी कोकाटे विद्यमान सदस्या आहेत, आता सोमठाणे गट महिला राखीव झाल्याने त्या तेथून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. या गटात फारसा बदल झालेला नाही. या गटातील धारणगाव, देवपूर आणि मिरगाव ही तीन गावे वगळण्यात आली आहे. मात्र त्यांना यंदा आरक्षणाची लॅाटरी लागली तरीही घरचेच मोठे आव्हान असेल. त्यांच्या काकी भारती भारत कोकाटे त्यांच्या विरोधात उमेदवारी करतील. या लढाईत सिमंतीनी कोकाटे यांना घरचे आव्हान पेलवेल का? याची चर्चा आहे.

बनकर यांनी घरचेच आव्हान

निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव हे दोन गट महिला राखीव आहेत. उर्वरीत सर्व गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यात पिंपळगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी सदस्य आहेत. त्यांचा गट वाचला मात्र सध्याचे राजकारण आमदार बनकर विरूद्ध शिवसेनेचे भास्करराव बनकर असे आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटी गटात भास्करराव बनकर यांनी बाजी मारली होती. ते पाहता आमदार बनकर यांना लढत सोपी दिसत नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com