आमदार कोकाटे समर्थकांनी पराभवाची परतफेड केली

दोडी बुद्रुक सहकारी सोसायटीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
NCP candidates celebration with Balasaheb Wagh
NCP candidates celebration with Balasaheb WaghSarkarnama

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील (Sinner) दोडी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी (Cooperative) सोसायटीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या परिवर्तन पॅनलने अकरा जागांवर विजय मिळवत 'परिवर्तन' घडविले. पांडुशेठ केदार यांच्या सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलला अवघ्या २ जागावर समाधान मानावे लागले.

NCP candidates celebration with Balasaheb Wagh
...यामुळेच दीपक पांडेंना शासनाने दोन वेळा निलंबित केले!

माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ, माजी सरपंच पी. जी. आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातून अमृता कृष्णा आव्हाड, रघुनाथ एकनाथ आव्हाड, अनिल गणपत जाधव, गेणू वाळीबा साळे, वसंत कारभारी शेळके, मनोहर रामचंद्र वाघ, तर शेतकरी विकास पॅनलचे निवृत्ती म्हतारबा आव्हाड व बाळू हरी दराडे यांनी विजय संपादन केला. शेतकरी विकास गटाचे गोपाळ जयराम आव्हाड, दत्तात्रय कारभारी जाधव, लहाणू हरी सांगळे, सुरेश नामदेव शिंदे, नामदेव कचरू शेळके, ज्ञानेश्वर पांडुरंग उगले व परिवर्तनचे भाऊपाटील जयराम आव्हाड, छगन गोविंद उगले यांना पराभव पत्करावा लागला.

NCP candidates celebration with Balasaheb Wagh
कादवा साखर कारखान्याचे बॅास श्रीराम शेटेच, विरोधकांना भोपळा!

अनुसूचित जाती जमाती गटातून अरूण दादा भालेराव, महिला राखीव गटातून शकुंतला बाळासाहेब वाघ व हिराबाई बाळासाहेब आव्हाड यांनी विजय खेचून आणला. शांताबाई विठ्ठल केदार व सखुबाई मधुकर आव्हाड यांना पराभवाचा धक्का बसला. इतर मागासवर्गीय गटातून सूर्यभान नामदेव आव्हाड यांनी एकनाथ शिवराम आव्हाड यांचा पराभव केला. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून शिवाजी कारभारी केदार यांनी शरद बारकू कांगणे यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. निकाल घोषित होताच वाघ समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

त्या पराभवाची परतफेड

बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली १७ वर्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर वर्चस्व होते. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पांडूशेठ केदार यांनी सोसायटीची सत्ता ताब्यात घेतली होती. बाळासाहेब वाघ यांनी त्याची परतफेड करत या निवडणुकीत १३ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळवत सत्तेची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com