मंदाकिनी खडसे यांना 12 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा..

मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अटक पूर्व जामीनावर आज सुनावनी होती.
Mandakini Khadse,Eknath Khadse

Mandakini Khadse,Eknath Khadse

Sarkarnama

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Bhosari Land Scam Case) राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Ekneth Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अटक पूर्व जामीनावर आज (ता.21 डिसेंबर) सुनावनी होती. झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) त्यांना दिलासा मिळाला असून त्यांना 12 जानेवारीपर्यंत अटक करता येणार नाही, असा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांनी दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील वर्षी 12 जानेवारीला होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Mandakini Khadse,Eknath Khadse</p></div>
टीईटी प्रकरणात ५ कोटींचा गैरव्यवहार? अमिताभ गुप्ता

याआधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर त्या मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना 14 ऑक्टोबरला अटकेपासून दिलासा मिळाला. त्यावेळी त्यांना दर मंगळवारी व शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबतचे आदेश न्यायालयाकडून मागे घेण्यात आले. याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी झाली आणि मंदाकिनी खडसे यांना 12 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी पुढील वर्षीच्या 12 जानेवारीला होणार आहे. या प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केरण्यात आली होती.

<div class="paragraphs"><p>Mandakini Khadse,Eknath Khadse</p></div>
देवस्थान जमीन घोटाळा : भाजप आमदार सुरेश धस, माजी आमदार धोंडे यांची ईडीकडे तक्रार

दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी पिंपरी-चिंचवड भोसरी येथील एमआयडीसीमधील जमीन मूळ मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली होती. या जमीनीचा नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करण्यात आलेली आहे. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक आहेत. या व्यवहारासाठी गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे सुमारे 61 कोटी रुपयांचा महसुलाचे नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती सांगण्यात येते. त्यामुळेच खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती व फडणवीस सरकारमध्ये मंत्री असतांना झालेल्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com