Malegaon News: भाजपने राज्यपालांची हाकालपट्टी न केल्यास महागात पडेल

मालेगाव येथे तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ निवेदन देताना पदाधिकारी.
NCP delegation of Malegaon
NCP delegation of MalegaonSarkarnama

मालेगाव : केंद्रात भाजपचे (BJP) राज्य आहे. त्यांनी भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या शिफारशीने महाराष्ट्राच्या (Maharashtra) राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. राज्यपाल कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा अवमान करतात. त्यामुळे भाजपनेच पुढाकार घेऊन त्यांची हाकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केली आहे. (NCP aggrassive against Governer koshyar

NCP delegation of Malegaon
पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण सोडतीने विद्यमान २५ नगरसेवकांचा पत्ता कट; गाववाल्यांची कोंडी

मुंबईतून गुजराती, राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचा अपमान केला. त्यांन महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे मराठी माणसामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी व त्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राजभवनाला एक लाख पत्रे पाठविण्यात येणार आहेत.

NCP delegation of Malegaon
मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरच हल्ला करण्याचा होता कट..! शिवतारेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनंत भोसले, कार्याध्यक्ष मनमोहन शेवाळे आदींच्या नेतृत्वाखाली येथील मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीत पत्रे टाकली. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू झाली आहे. आंदोलनात अन्सारी हाशिम, शकील जानी बेग, अस्लम अन्सारी, महेश शेरेकर, राजेंद्र आहिरे, शाबान तांबोली, रवींद्र शिवदे, कल्पेश गायकवाड, पांडुरंग भदाणे, राजेंद्र पवार आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात व पत्रात राज्यपाल हे पद वरिष्ठ असून, त्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येकाला आदर आहे. सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असून, ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. यापूर्वी त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. भाजप तरीदेखील त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांचा निषेध व राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे श्री. ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in