रावेर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार

येथील पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे एकत्रितरीत्या लढण्यावर स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकमत झाले.
Shirish Choudhary, MLA
Shirish Choudhary, MLASarkarnama

रावेर : येथील पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे(Mahavikas Front) एकत्रितरीत्या लढण्यावर स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकमत झाले असून, (They came to conclusion to came togather) प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यावर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Choudhary) यांनी दिली.

Shirish Choudhary, MLA
पांडेजी म्हणतात, `नो हेल्मेट, नो पेट्रोल` नंतर नाशिकमध्ये `नो होर्डिंग`

येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख इच्छुक नेत्यांशी चर्चा करून, त्यांची मते जाणून घेतली.

राज्यात हे तीनही पक्ष सत्तेत असल्याने पालिकेची निवडणूकदेखील आघाडी करूनच लढवावी, असा विचार श्री. चौधरी यांनी मांडला. त्यावर उपस्थित सर्वांनीच अनुमोदन दिले. मात्र, जागावाटप आणि उमेदवारीबाबत अंतिम निर्णय आताच घेता येणार नाही. अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यावरच याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा, अशी सूचना कार्यकर्त्यांनी मांडली. नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रल्हाद महाजन, रमेश महाजन (गोठूशेठ), हरीश गनवाणी, अनिल अग्रवाल, प्रकाश मुजुमदार, सोपान पाटील, आसिफ मोहम्मद, ज्ञानेश्‍वर महाजन, नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी (खिरवडकर), रवींद्र पवार, डॉ. राजेंद्र पाटील, मेहमूद शेख, प्रणित महाजन उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com