एकीकडे आघाडीत फुटीची चर्चा, धुळ्यात मात्र गळ्यात गळा

धुळे शहरात ‘भारत जोडो’ यात्रेच्या रॅलीला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा सहभाग.
Bharat Jodo march In Dhule
Bharat Jodo march In DhuleSarkarnama

धुळे : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समर्थनार्थ शहरात (Dhule) शनिवारी सकाळी रॅली निघाली. यात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष शिवसेना (ठाकरे गट), (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) काँग्रेससह (Congress) इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. (All party of Mahavikas Aghadi are unite in Dhule for congress rally)

Bharat Jodo march In Dhule
काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नाट उत्तर

राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयावरून आघाडीत फूट पडू शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत धावपळ उडाली असताना, धुळे शहरात मात्र तिन्ही पक्षांतील एकोपा चर्चेचा विषय ठरला.

Bharat Jodo march In Dhule
माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे निधन!

मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी नऊला रॅली निघाली. आग्रा रोडने निघालेल्या रॅलीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला. आरपीआयचे प्रा. बाबा हातेकर, ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले, महेंद्र शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, महेश मिस्तरी, हेमंत मदाने, मुजफ्फर हुसेन, पोपट चौधरी, हरिश्‍चंद्र लोंढे, रमेश श्रीखंडे, प्रकाश शर्मा, राजेंद्र खैरनार, राजेंद्र चौधरी, संजय खैरनार, दीपक पाटील, हरी चौधरी, भिवसन अहिरे, गुफरानशेट पोपटवाले, अब्दुल सलाम मास्टर, शकिला बक्श, जया साळुंखे आदी सहभागी झाले.

शेगाव येथे यात्रा

देशात एकात्मतेचा संदेश देत निघालेल्या भारत जोडो यात्रेतील ऐतिहासिक तिरंगा ध्वज संचलनाचा बहुमान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांना मिळाला. कन्याकुमारी येथून सात सप्टेंबरला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खासदार गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपवल्यानंतर यात्रा सुरू झाली. श्रीनगर येथे तिरंगा फडकावून यात्रेचा समारोप होईल. यात शेगाव येथून शनिवारी सकाळी सहाला सुरु झालेल्या यात्रेत ऐतिहासिक तिरंगा संचलनाचा बहुमान अश्विनी पाटील यांना मिळाला. माजी मंत्री जयराम रमेश, कन्हय्याकुमार यांच्या नेतृत्वाखाली यात्रेत त्या सहभागी झाल्या. आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला, खानदेशासाठी मान व गौरवाचा दिवस होता, अशी प्रतिक्रिया सौ. पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com