Maratha: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा!

सटाणा येथे महाविकास आघाडीतर्फे तानाजी सावंत यांच्या विरोधात आंदोलन
Mahavikas Aghadi leaders at Satana
Mahavikas Aghadi leaders at SatanaSarkarnama

सटाणा : मराठा (Maratha Community) समाजाच्या आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्‍या आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी तत्काळ मराठा समाजाची माफी मागावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सावंत यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा देत सावंत यांच्याविरोधात बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. (Mahavikas Aghadi front deemands resignation of Minister Tanaji Sawant)

Mahavikas Aghadi leaders at Satana
Eknath Khadse: जिल्हा दूध संघाचे काम पारदर्शीच!

सकाळी अकराला माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत बागलाण तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

Mahavikas Aghadi leaders at Satana
पिंपळगावकरांनी उपसले निवडणुकीवर बहिष्कारास्त्र!

श्री. चव्हाण म्हणाले, तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य करून ते समाजासाठी कलंक असल्याचे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, हे अत्यंत निषेधार्ह आहे.

लालचंद सोनवणे म्हणाले, मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्‍नासाठी सातत्याने संघर्ष करत असताना त्यांच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्याऐवजी सावंत समाजाचा अपमान करत आहेत. सावंत यांनी तत्काळ मराठा समाजाची माफी मागावी. किशोर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात पांडुरंग सोनवणे, शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, रत्नाकर सोनवणे, राजनसिंह चौधरी, सुयोग अहिरे, जयवंत पाटील, सागर वाघ, सुमित वाघ, नितीन मांडवडे, संजय पवार, अमोल बच्छाव, दादू सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, विक्रांत पाटील, संजय गरुड, किशोर म्हसदे, दिलीप अहिरे, नितीन सोनवणे, रोहित सोनवणे, पियुष सोनवणे, शरद शेवाळे, किरण मोरे, मोहन खैरनार, सुरेश पगार, रवींद्र पवार, साहेबराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, राजू जगताप, झिपरू सोनवणे, नितीन सोनवणे, कैलास खैरणार, सुनील पाटील, नीलेश कर्डीवाल, विशाल आंबेकर, युवराज वाघ आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com