Parner Bazar Samiti Results: विखेंना मोठा धक्का : पारनेरमध्ये लंकेंच; महाआघाडीचा 18 पैकी 18 जागांवर विजय

Parner Bazar Samiti Results : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
Parner Bazar Samiti Results
Parner Bazar Samiti ResultsSarkarnama

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली.

त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अहमदनगरधील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. सर्व 18 पैकी 18 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी केलेली युती या निवडणुकीत महत्वाची ठरली. तर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

Parner Bazar Samiti Results
Pathardi Bazar Samiti Results: मोनिका राजळेंचा प्रताप ढाकणेंना मोठा धक्का; 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय

दरम्यान, पारनेर बाजार समितीची निवडणूक खासदार डॉ.सुजय विखे, आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली होती.

भाजपने सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर बाजार समितीत पॅनल उभा केला होता. मात्र, आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी हे एकत्र आल्यामुळे या निवडणुकीभाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com