पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय!

नवापूर येथे विजयी उमेदवार सुनील गावित व समर्थकांनी जल्लोष केला.
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय!
NCP`s Sunil Gavit Sarkarnama

नवापूर : जिल्हा परिषदेच्या (ZP) चितवी (ता. नवापूर ) गटासाठी तर असली (ता.धडगाव ) पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विजय झाला आहे. जिल्हा परिषद चितवी गटासाठी राष्ट्रवादीचे (NCP) सुनील गावित (Sunil Gavit) तर असली पंचायत समिती गणात सोनिया वळवी (Soniya walvi) यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. (Mahavikas Aghadi wins on two seats in ZP elections)

NCP`s Sunil Gavit
महसूलच्या प्रत्येक बदलीत एक-दीड कोटींची वसुली!

जिल्हा परिषद चितवी गटासाठी व असली पंचायत समिती गणासाठी झालेल्या मतदानानंतर तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली. चितवी गटात महा विकास आघाडीचे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील सुरेश गावित यांचा दोन हजार ३१८ मतांनी विजय झाला आहे. त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित हे पराभूत झाले आहेत.

NCP`s Sunil Gavit
राज्यकर्त्यांनी हर्बल गांजा ओढणे सोडावे!

रवींद्र नकट्या गावित यांना एकूण पाच हजार ३०५ मते मिळाली तर विजयी उमेदवार सुनील सुरेश गावित यांना सात हजार ६२४ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे चितवी गटाच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या साडेचार टक्के म्हणजेच ६१६ मतदारांनी नोटाला मतदान केले.

चितवी जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार सुनील गावित यांचे वडील या गटाचे सदस्य होते. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पद रिक्त झाल्याने पोटनिवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना निळे-ठुबे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, आदींच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक सुरळीत पार पडली.

असली (ता. धडगाव) पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार कल्पना वसावे व कॉग्रेसच्या सोनिया वळवी यांच्यात सरळ लढत झाली. असली (ता.धडगाव) येथील पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या सोनिया वळवी या तीन हजार ३४९ मतांनी विजयी झाल्या.

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या गावातील निवडणूक असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या प्रतिष्ठेच्या लढतील कॉंग्रेसने बाजी मारली आहे. एकुण सहा हजार ३८९ मतांपैकी कॉंग्रेसच्या सोनिया वळवी यांना चार हजार ६१६ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार कल्पना वसावे यांना १ हजार २६७ मते मिळाली. त्यामुळे सोनिया वळवी या ३ हजार ३४९ मतांनी विजयी झाल्या. ५०६ जणांची नोटाचा अवलंब केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in