APMC Election: गिरीष महाजनांची कोंडी करण्याच्या हालचाली!

Girish Mahajan: महाविकास आघाडी जिल्हा बँकेचा महाविकास आघाडीचा प्रयोग बाजार समित्यांतही करणार
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

Jalgaon News: जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) पॅनल उभे करण्याचा निर्णय माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे भाजपचे (BJP) मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांची कोंडी करणाचा जिल्हा बँक निवडणुकीतील (Election) प्रयोग पुन्हा एकदा रचण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. (Mahavikas Aghadi leaders will reorganised for APMC election in Jalgaon)

जळगाव बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीच्या तालुक्यातील नेत्यांची प्राथमिक स्वरूपाची बैठक बुधवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली मजूर फेडरेशनच्या कार्यालयात झाली.

Girish Mahajan & Eknath Khadse
Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कापूस फेकला; नेमकं काय घडलं?

या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची विस्तृत बैठक घेण्यात येईल. त्यात पॅनल निश्चित करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संघटीत करून पॅनेल निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्या निवडणुकीत शेवटपर्यंत नेत्यांमध्ये चर्चेचा घोळ सुरु होता. त्यात सर्वपक्षीय पॅनेलची चर्चा होती. मात्र माघारीच्या शेवटच्या टप्प्यात अचानक श्री. खडसे यांनी पॅनेलमध्ये भारतीय जनता पक्षाला समाविष्ट करण्यास नकार दिला.

Girish Mahajan & Eknath Khadse
Shivsena News; खेडच्या सभेत प्रतिमाणसी हजार रुपये अन् बिर्याणी

भाजपच्या उमेदवारांची शेवटच्या क्षणी तारांबळ उडाली. मंत्री गिरीष महाजन एकाकी पडल्याने बँकेच्या निवडणुकीत भाजपचा अवघा एक उमेदवार विजयी झाला होता. त्याचा वचपा त्यांनी वर्षभराने झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढला. त्यात चार सदस्य फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. आता पुन्हा तशाच हालचाली सुरु झाल्याने राजकारणात रंगत येण्याची चिन्हे आहेत.

या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा बँकेचे संचालक श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, युवा सेनाप्रमुख नीलेश चौधरी, काँग्रेसचे बेनहर टेलर, माजी नगरसेवक मनोज चौधरी, लीलाधर तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com