Cantonment Election: देवळालीच्या निवडणुकीत भाजप विरोधात कसबा पॅटर्न!

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सुरु केल्या इच्छुकांच्या मुलाखती
Hemant Godse & Vijay Karanjkar
Hemant Godse & Vijay KaranjkarSarkarnama

Nashik News: देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या (Cantonment Board election) निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनी एकत्र येत भाजप (BJP) विरोधात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधकांची विखुरलेली शक्ती संघटीतपणे सामना करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. (There will be straight fight with BJP in Devlali Cantonment board election)

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणुकीत 2015 मध्ये पहिल्यांदाच भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने स्वतंत्र पॅनेल केले होते. त्यात त्यांचे सहा उमेदवार विजयी झाले होते. कावेरी कासार या अपक्ष तर शिवसेनेच्या आशा चंद्रकांत गोडसे विजयी झाल्या होत्या. निवडणूक लांबल्याने भाजपच्या प्रीतम आढाव यांची शासन नियुक्त उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती.

Hemant Godse & Vijay Karanjkar
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

या संदर्भात शिवसेनेने नुकतीच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. सोमनाथ बोराडे आणि विष्णूपंत म्हैसधुणे यांचे पॅनेल त्यासाठी कार्यरत आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाशी युती केली आहे. त्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील या आघाडीत सहभागी होण्याची तयारी दाखवत निम्म्या जागा मागितल्या आहेत.

Hemant Godse & Vijay Karanjkar
Cantonment Elections: शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंची पहिली अग्नीपरीक्षा!

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळवंत गोडसे यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या दोन बैठका घेतल्या. त्याला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच वंचीत बहुजन आघाडीच्या नेते सहभागी झाले. यावेळी सर्व पक्षांनी आठही प्रभागांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रभावी उमेदवारांचा शोध घ्यावा. त्यानंतर शक्यतो सर्व पक्षांच्या उमेदवारांसाठी जागावाटप करावे. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा वाटा असेल. काँग्रेस आणि वंचित आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी घटक पक्षांची तयारी असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Hemant Godse & Vijay Karanjkar
NCP News; भाजपवासी अमृता पवार यांनी राष्ट्रवादीला निष्ठा शिकवू नये!

स्थानिक नेते काहीही दावे करीत असले तरी, सध्या कोणत्याच एका पक्षाकडे सर्व आठ प्रभागांसाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे संघटीतपणे व एकोप्याने पॅनेल पद्धतीने सत्ताधारी भाजपला आव्हान देण्याचा विचार सुरु आहे. `कसबा` पॅटर्न डोळ्यापुढे ठेऊन ही तयारी सुरु आहे. त्यामुळे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाची निवडणूक चुरशीची व रंजक होण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com