नाशिकला बंद; कार्यकर्त्यांच्या घोषणा `पंतप्रधान मोदी होश मे आओ`

बंदसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी एकत्रीतरित्या बाजारपेठेत फिरून व्यापारी व नागिरकांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
नाशिकला बंद; कार्यकर्त्यांच्या घोषणा `पंतप्रधान मोदी होश मे आओ`
Nashik BandhSarkarnama

नाशिक : लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri of Uttar Pradesh) येथाल शेतकरी हत्याकांड आणि केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front) घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला (Appeal for Bandh) शहर व जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. विशेषतः बाजार समित्या बंद राहिल्या. या बंदसाठी कोणीही सक्ती केलेली नसल्याने त्याचा संमिश्र परिणाम दिसून आला.

Nashik  Bandh
मी त्यांना पाडले, हे कळायला एकनाथ खडसेंना दोन वर्षे लागली?

या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यालयातून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. बंदसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी एकत्रीतरित्या बाजारपेठेत फिरून व्यापारी व नागिरकांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करीत होते. यावेळी उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Mahavikas Aghadi Pheri in Nashik city
Mahavikas Aghadi Pheri in Nashik citySarkarnama

नाशिकसह प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांच्या आवारातील खरेदी-विक्रीचे व्यावहार पूर्णतः ठप्प झाले होते. ग्रामीण भागात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी शिवसेनेच्या शालीमार चौकातील कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्ते, नेत्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्रीत शहरात फिरून घोषणा देत बंदचे आवाहन केले. शालीमार, जुने नाशिक, मेन रोड, जुना आग्रा रोड, अशोक स्तंभ, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड आदी भागात पिरल्यानंतर काँग्रेस भवन येथे जमलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रते, नेत्यांनी बंदचे समर्थन करणारी भाषणे दिली.

Nashik  Bandh
प्रश्न `एनसीबी` भाजप कनेक्शनचा; गिरीश महाजन बोलले `एनसीपी` वर!

नाशिकला महाविकासच्या घोषणा

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी माहपौर वसंत गिते, सुनिल बागूल, अॅड यतीन वाघ, नगरसेवक अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, रवींद्र पगार, गजानन शेलार, कोंडाजी मामा आव्हाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, डॅा शोभाताई बच्छाव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले आदींसह मोठ्या संख्येने शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यानी फेरी काढली.

नाशिक रोडला फेरी

नाशिक रोड भागात बंदसाठी आवाहन म्हणून फेरी काढण्यात आली. यामध्ये माजी आमदार योगेश घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, शिवाजी भोर, रमेश औटे, अशोक खालकर, शांताराम भागवत, नगरसेवक प्रशांत दिवे, श्याम खोले, राजु मोरे, नियामत शेख, योगेश इंगवले, संजय पगारे, ताहेर शेख, शिवा ताकाटे, अशोक सातभाई, किरण डहाळे, महानुभाव, विकास गिते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. पिपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे या बंदला पाठींबा देण्यात आला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक रोड येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

...

Related Stories

No stories found.