Jalgaon Bazar Samiti Result : जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने खाते उघडले; दिलीप काशिनाथ कोळी विजयी

Jalgaon Politics : जळगाव बाजार समितीचे निकाल समोर येत आहेत
Girish Mahajan, Eknath Khadse, Gulabrao Patil
Girish Mahajan, Eknath Khadse, Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon Market Committee : राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव बाजार समितीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये पहिला निकला महाविकास आघाडीच्या बाजूने आला आहे.

जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खाते उघडले आहे. दिलीप काशिनाथ कोळी हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये येथे काटेकी टक्कर आहे. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse, Gulabrao Patil
Nanded District APMC News : कुटुंरमध्ये काॅंग्रेस-भाजप युतीची बाजी, आमदार जळगावकरांनी हिमायतनगर राखले..

बाजार समितींच्या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे. शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे हे होमपीच आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने स्थानिक पातळीवर या नेत्यांना कसे मिळते याकडे अनेकांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांचे निकाल समोर आले आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse, Gulabrao Patil
Patoda Bazar Samiti : पाटोदा-शिरुर बाजार समितीच्या मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते-पोलीस भिडले

जळगाव जिल्ह्यातील 6 पैकी 4 बाजार समित्यांमध्ये भाजप-शिंदे गटाला यश मिळाले. तर दोन बाजार समितीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. महाजन यांचे होमग्राउंड असलेलया जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने सत्ता मिळवली. पण रावेरमध्ये भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ला असलेल्या धरणगाव बाजार समितीचा निकाल ही थोड्याच वेळात समोर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com