भुजबळांचे गेलेले मंत्रिपद विकासासाठी ‘स्पीडब्रेकर’ न ठरो!

जिल्हा नियोजनची कामे रद्द केल्याने मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना धक्का दिला.
Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Nashik News, Yeola News
Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Nashik News, Yeola NewsSarkarnama

येवला : येवला-लासलगाव (Yeola) मतदारसंघासाठी हेवीवेट नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणजे विकासपुरुष हे समीकरण रूढ झाले आहे. अर्थात मागील पाच वर्षे सत्तेशिवाय अन् भुजबळांसाठी अडचणीची गेली. २०१९ मध्ये सत्ता आणि मंत्रिपद मिळूनही कोरोनामुळे दीड वर्ष विकासाला खीळ बसली. (Yeola people confused about new Government`s role about Chhagan Bhujbal)

Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Nashik News, Yeola News
संजय राऊत करणार नाशिकला शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन!

विकासकामांची गाडी रुळावर येऊन निधी व योजना पदरी पडू लागताच, सत्तांतराच्या नाट्यात छगन भुजबळ यांची मंत्रिपदाची संधी गेली. त्याची मोठी किंमत येवला मतदारसंघाला मोजावी लागणार आहे. भुजबळांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळे निधी मिळेल अशी अपेक्षा असली तरी गेलेले मंत्रिपद व सत्ता येवल्याच्या विकासासाठी ‘स्पीडब्रेकर’ ठरू नये, अशी साद सर्वसामान्य घालत आहेत.(Nashik Latest Marathi News)

Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Nashik News, Yeola News
दादा भुसेंच्या बैठकीत मोबाईल स्वीच ऑफ अन् कडेकोट बंदोबस्त

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने २००४ ते २०१४ या दहा वर्षांत या मतदारसंघात विकासाचे नंदनवन फुलले. मागील ५० वर्षांत झाला नसेल असा विकास येथे साकारला. मात्र २०१५ ते २०१९ या भाजपच्या सत्ताकाळाचा कालखंड येवलेकरांसाठी वनवासाचा होता. मतदारसंघाच्या विकासाला खीळ बसलीच पण भुजबळांनाही या काळात अनेक संकटांना सामना करावा लागला.

सुदैवाने २०१९ मध्ये सत्ता आली अन् कॅबिनेट मंत्रिपदासह जिल्ह्याचे पालकमंत्रिपद वाट्याला आल्याने येथील विकासाला पुन्हा चालना मिळू लागली. अनुभवी भुजबळांकडे मंत्रिमंडळ स्थापनेवेळी चार ते पाच खात्यांची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात मिळाली होती. याचा फायदा उचलत या सर्व खात्यातून त्यांनी अनेक कामे मंजूर करून घेतली. पुढे दीड वर्षाचा कालावधी कोरोनात अडकल्याने विकासाला अडथळे आले, मात्र मागील दहा-बारा महिन्यांपासून कोरोना गेला आणि विकासाला गती मिळाली होती.

भुजबळांच्या माध्यमातून शहरामध्ये भव्य शिवसृष्टीसाठी सुमारे पाच कोटींहून अधिक निधी मंजूर असून, काम सुरू आहे. मुक्तिभूमीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुमारे १५ कोटी, राजापूरसह ४१ गाव योजनेसाठी सुमारे ६२ कोटी, तर शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी सुमारे ४८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. चिचोंडी औद्योगिक वसाहतीला चालना देण्यासाठी बैठका सुरू होत्या, तर मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव ते डोंगरगाव पोचकालव्याच्या कामालादेखील गती मिळाली होती. अनेक शहरांत पालिका हद्दीत ५० कोटींच्या आसपास कामे मंजूर आहेत. रस्त्यांना झळाळी मिळत आहे.

...तर येवला मतदारसंघाला झटका

सद्यःस्थितीत झालेल्या कामांची बिले मार्गी लागतील पण नव्याने मंजूर झालेल्या अन् निधीच्या प्रक्रियेत असलेल्या कामांना सत्तांतर झाल्यानंतर ब्रेक लागला तर येवला मतदारसंघाच्या शंभर कोटींहून अधिक विकासकामांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाची कळकळ असणाऱ्यांना सत्ता गेल्याने निधी व विकासाची चिंता लागून आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातूनही भुजबळांनी येवल्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. यावरून नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आक्षेपही घेतला होता, तर नुकतीच ५६७ कोटी रुपयांची कामे भुजबळांनी जिल्ह्यासाठी मंजूर केली, तीदेखील नव्या सरकारने पहिल्याच झटक्यात स्थगित केली आहेत. यातून कोट्यवधींचा झटका येवला मतदारसंघाला बसला आहे.

भुजबळांच्या कौशल्याची परीक्षा

नव्या सरकारची सुरवातच अशी अडथळ्याने झाल्याने पुढे कसे होणार आणि काय होणार हा सवाल सर्वसामान्य येवलेकरांना लागला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील भाषणात भुजबळसाहेब आणि कांदे यांच्यात जुळवून घेऊ, असे सूतोवाच केले असले, तरी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी आमदारांना निधी वितरणात हात आखडता घेतला जातो हे सर्वश्रुत असल्याने मंजूर असलेल्या कोट्यवधींच्या योजना पूर्ण करण्यासाठी भुजबळांना नक्कीच ताकद लावावी लागणार हे नक्की! राज्याच्या या सत्तांतरात राजकीय पटलावर जो तो त्याच्या सोयीने विचार मांडत असला, तरी सर्वसामान्य येवलेकर मात्र विकासाच्या नुकसानीचाच अधिक विचार करताना दिसत आहे.

भुजबळांचा आज कार्यकर्त्यांशी संवाद!

कोरोनाकाळात आठवड्याला एकदा येऊन येथे आढावा बैठक घेणारे आणि अधिकाऱ्यांना सक्रिय ठेवणारे भुजबळ मतदारसंघाविषयी दक्ष असतात. राज्यातील सत्तांतराचा गोंधळ सुरू झाल्यापासून ते येथे आलेले नव्हते. आता सत्ता अन् मंत्रिपद नाही, अशा स्थितीत भुजबळ गुरुवारी (ता. ७) प्रथमच येवल्यात येत आहेत. येथे कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेतल्यानंतर सकाळी अकराला ते राधाकृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावादेखील घेणार आहे. सत्ताबदलानंतर भुजबळांचा पहिलाच दौरा असून, या मेळाव्यात ते काय भूमिका मांडतात याकडे आता येवलेकरांचे लक्ष लागून आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in