रोजगार गुजरातला अन् राज्यात केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी करणार का?

छगन भुजबळ यांनी टाटा एअरबस प्रकल्पासाठी आधीच प्रस्ताव दिला होता.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रकल्प पळविले जाताय ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक (It is sensetive issue) बाब आहे. हा प्रकल्प येथील एचएएल (HAL) कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे (Tata Group) सर्वेसर्वा रतनजी टाटा (Ratan Tata) यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच पत्राद्वारे केली होती, अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. (Chhagan Bhujbal criticised Shinde Government on His industrial policy)

Chhagan Bhujbal
Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक आहे.

Chhagan Bhujbal
Shivsena : उध्दव ठाकरे अॅक्शन मोडवर..घेणार महाराष्ट्राचा आढावा...तारीखही ठरली!

छगन भुजबळ यांच्यासोबत आज नाशिक येथील कार्यालयात माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर २०२१ मध्ये भारतसरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी २२ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकल्प नाशिकच्या ओझर मध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सांगत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अनेक प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला डावलल जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित रहायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com