चित्राताई, फडणवीसांच्या कार्यकाळातच सर्वाधीक महिला अत्याचार!

भाजपशासित राज्यात महिलांवर अत्याचारांत वाढ झाल्याची माजी आमदार दीपिका चव्हाण यांची टीका
Deepika Chavan & Chitra Wagh
Deepika Chavan & Chitra WaghSarkarnama

नाशिक : देशातील भाजपशासित (BJP govern states) राज्यात महिलांवर अत्याचार (Womens atrocity) सुरू आहेत. फडणवीसांच्या काळात गँगरेप व खुनाच्या ४७ घटना घडल्याने २०१९ मध्ये महिला अत्याचारात महाराष्ट्राचा (Maharashtra) दुर्दैवाने देशात पहिला क्रमांक आला होता. मात्र भाजपच्या चित्रा वाघ यांना त्याचे विस्मरण झालेले दिसते. त्यांनी थोडे मागे वळून पहावे, अस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी म्हटले आहे.

Deepika Chavan & Chitra Wagh
आमदार राहुल ढिकले यांनी नाशिकची पाणी योजना मार्गी लावली!

त्या म्हणाल्या, फडणवीसांनंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे नेहमी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

Deepika Chavan & Chitra Wagh
नगरसेवक झाले `माजी`, लेटरहेड, बोधचिन्ह वापरल्यास दाखल होईल गुन्हा?

नाशिक दौऱ्‍यावर आलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत महिला अत्याचारासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती चव्हाण यांनी मंगळवारी थेट उत्तर दिले.

त्या म्हणाल्या, उत्तरप्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हरयाणा व कर्नाटक या भाजपशासित राज्यात गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मानवतेला काळीमा फासणाऱ्‍या घटनेच्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने केला. २०१६ मधील कोपर्डीच्या घटनेनंतर तत्कालीन फडणवीस सरकारला धारेवर धरणाऱ्या सुप्रियाताईंमुळेच आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली.

फडणवीस सरकारच्या काळात २०१५ साली ३१ हजार ०१६ घटना, २०१६ साली ३१ हजार ३८८, २०१७ साली ३१ हजार ९७८, २०१८ साली ३५ हजार ४९७, तर २०१९ साली ३७ हजार १४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० पासून महिला अत्याचार, सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com