Chhagan Bhujbal News; गुजरात मदत देते, मग महाराष्ट्र सरकार काय करतेय?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त झाले, तरीही राज्य सरकार गप्प का? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : ज्या वेळेला सबंध जग होळी खेळत होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या (Farmers) जीवनाची होळी झाली. सर्व रंग खेळत होते, त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गाव शेतकऱ्यांनी चक्क विकायला काढले, शेतकऱ्यांची ही अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) आजच्या आज मदतीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेत केली. (Today Chhagan Bhujbal attract Government on Frmers issue)

Chhagan Bhujbal
Nashik News: केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही!

गेले आठवडाभर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल आहेत. त्यांना कवडीमोल कांदा विकावा लागत आहे. शेजारचे गुजरात राज्य साडे तीनशे कोटींची मदत जाहीर करते, मग एव्हढा मोठा महाराष्ट्र मागे का?. सरकार काय करीत आहे, अशी टिका भुजबळ यांनी केली.

Chhagan Bhujbal
Shocking News: आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मतदारसंघातील ‘गाव विकणे आहे’

विधानसभे तातडीचा प्रश्न म्हणून याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, कांदा, मका, गहू, द्राक्षे सर्व पीकांचे प्रचंड नुकसान झाले. द्राक्षबागांचे अँगल उखडले गेले. पुढील पाच वर्षे शेतकरी आता उभा राहू शकत नाही, कारण पुन्हा रोपांची लागवड करायची, बाग उभा करायचा. शेतकऱ्यांचे वाटोळे झाले. गुजरात राज्याने साडे तीनशे कोटी रुपयांचे अनुदान दिले. वाहतुकीसाठी अनुदान दिले. निर्यातीवरील अनुदान दिले, आपण काय करीत आहोत.

गुजरातपेक्षा महाराष्ट्र मोठे राज्य आहे. शेतकऱ्यांच्या समास्या तीव्र आहेत, मात्र नाफेड अद्याप पर्यंत कांदा खरेदीसाठी बाजारात उतरलेले नाही. बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करते. अतिशय वाईट स्थिती आहे. अवकाळी पावसामुळे आणखी वाईट स्थिती झालेली आहे. आज महिला दिन आहे. मात्र शेतकऱ्यांच्या महिला पावसाने झालेल्या नुकसानीने स्वतःची तोंडं बडवून घेत आहेत, रडत आहे, अशी दुःखाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर सरकार काय करणार?, याचं उत्तर दिलं पाहिजे.

Chhagan Bhujbal
Dilip Bankar News: कांदा आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी?

शेतकरी एव्हढा संतप्त आहे की, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना अडवलं. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना अडवलं. यावरून पावसामुळे शेतीची परिस्थिती किती हाताच्या बाहेर गेली आहे, याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे ताबडतोब, आजच्या आज सरकारने चर्चा घडवून आणली पाहिजे. काय उपाययोजना करणार ते सांगितले पाहिजे. आता शेतकरी कर्ज फेडणार कसे?. हाता तोंडाशी आलेला घास गेला, या शब्दांत भुजबळांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in