महाराजा सयाजीराव गायकवाड हे शिष्यवृत्ती संकल्पनेचे जनक

उदय सामंत यांची जीवनचरित्र विषयक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास ऑनलाइन उपस्थिती
Uday Samant
Uday SamantSarkarnama

नाशिक: ‘शिष्यवृत्ती’ (Scholarship) या संकल्पनेचे जनक हे महाराजा सयाजीराव गायकवाड आहेत. (Maharaja Sayajirao Gaikwad) त्यांनी त्या काळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली म्हणूनच आज सर्वसामान्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत आहे. महाराजांचा हा आदर्श ग्रंथरूपाने जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत राहू. ही ठेव जतन करणे आपले परमकर्तव्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.

Uday Samant
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी संबंधित पन्नास ग्रंथांचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चार टप्प्यांत झाले. त्या वेळी श्री. सामंत यांनी ऑनलाइन स्वरूपात संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, राजमाता शुभांगीराजे गायकवाड, समिती सचिव बाबा भांड, डॉ. धनराज माने व्यासपीठावर होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जीवनचरित्र चित्रपट, लघुपट, नाटक, मालिका या माध्यमांतून सर्वसामान्यांपर्यंत पोचवू, असेही मंत्री सामंत यांनी या वेळी सांगितले.

Uday Samant
शहराध्यक्ष देखील नसलेली काँग्रेस म्हणते, ‘एकला चलो’

श्री. भुजबळ म्हणाले, की महाराष्ट्रात जे युगपुरुष घडले, त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्वतोपरी मदत केली. असा राज्यकर्ता आता होणे नाही. प्रकाशन सोहळा समितीने पन्नास ग्रंथांचे प्रकाशन करून मोठा षटकार मारल्याचेही त्यांनी नमूद केले. शुभांगीराजे गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त करताना महाराजा गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला. या ग्रंथांचे लेखन करताना बरीचशी माहिती नाशिकमधून मिळाली व त्यामुळे संपादन करताना सुलभ झाल्याचे नमूद केले.

प्रकाशन समितीतर्फे सुरवातीला ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महाराजा सयाजीराव गौरवगाथा ग्रंथ प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करण्यात आले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धनराज माने यांनी आभार मानले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com