महाराष्ट्र वीज टंचाईवर करणार `अशी` मात!

सध्या सगळीकडे कोळसासाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना वीजनिर्मिती ठप्प होते की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र वीज टंचाईवर करणार `अशी` मात!
NTPS Pwer ProjectSarkarnama

नाशिक : एकीकडे जगभरात कोळसा (Coal Shortage for Power Generation in Country as well Maharashtra) तुटवड्यामुळे अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली असताना राज्यातील महानिर्मिती (Mahanirmiti compony have confident to face the challange) कंपनी समर्थपणे तोंड देत आहे. महानिर्मितीच्या विद्युत केंद्रांची एकूण स्थापित क्षमता १२,९७२ मेगावॉट असून निव्वळ औष्णिक वीजनिर्मिती व त्याचबरोबर जल व वायु विद्युतनिर्मिती मिळून सरासरी ८ हजार ५० मेगावॉटची (Nashik plant generate 8050 MW Power) निर्मिती सुरू आहे.

NTPS Pwer Project
परमवीर सिंग यांच्या नाशिकला समृद्धी महामार्गालगत बेनामी जमिनी?

सध्या सगळीकडे कोळसासाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना वीजनिर्मिती ठप्प होते की काय अशी शंका व्यक्त होत असताना महानिर्मिती राज्याच्या विजेची गरज भागविण्यास पूर्णपणे सज्ज आहे. त्यासाठी सरासरी सहा हजार ते आठ हजार मेगावॉट वीज निर्मिती करून महावितरण कंपनीस साहाय्य करीत आहे.

महानिर्मितीकडे सध्या सरासरी २ दिवसांइतका कोळसा साठा उपलब्ध आहे. मात्र ४ ऑक्टोबर २०२( पासून कोळसा पुरवठ्यात सुधारणा झालेली असून सरासरी दररोज ९० हजार ते एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू आहे. १० ऑक्टोबर रोजी कोळशाच्या साठ्यामध्ये वृद्धी होऊन तो १.९१ लक्ष टन इतका झाल्यामुळे महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांतून होणारी वीजनिर्मिती १२५ मिलियन युनिट्स (५२०० मेगावॉट) पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

NTPS Pwer Project
सावध व्हा, आधी दुप्पट दर देतील, नंतर जनतेला नागवतील!

पावसाळ्यातील गरज भागविण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून दरवर्षी कोळशाचा साठा करण्यात येतो. यावर्षी महार्निर्मितीच्या सर्व वीज केंद्रातील कोळशाचा साठा जुलै महिन्यात १८.११ लक्ष टन एवढा होता. हा साठा मागील ३ वर्षांच्या सरासरी (१५ लक्ष टन) पेक्षा जास्त होता. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात महानिर्मितीकडून सरासरी ३ हजार मिलियन युनिट्स वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु या वर्षी ऑगस्ट महिन्यात विजेची मागणी अचानक वाढल्यामुळे ४ हजार तिनशे मिलियन युनिट्स विजेचा पुरवठा करण्यात आला. परिणामी, महानिर्मितीच्या कोळसाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली (एक ऑगस्ट रोजी १४.११ लक्ष टन, ३१ ऑगस्ट रोजी ३.७१ लक्ष टन) आहे.

चार विद्युत संच बंद

सद्यःस्थितीत कोळसा वापराचे नियोजन केल्यामुळे महानिर्मितीचे ४ विद्युत संच बंद ठेवण्यात आलेले आहेत. यात चंद्रपूर, भुसावळ व पारस येथील संचांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये संपूर्ण महिनाभर महानिर्मितीने सरासरी चार हजार ५०० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती साध्य केली. पुढील आठवड्यात कोळसा पुरवठा पूर्ववत होऊन वीजनिर्मिती सामान्य स्तरावर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दृष्टीक्षेपात

* पावसाळ्यात कोळशाचा पुरवठा कमी होतो.

* यंदा ऑगस्ट महिन्यात मागणी वाढल्यामुळे कोळसा वापर जास्त झाल्याने कोळसा तुटवडा

* ३ ऑक्टोबर पर्यंत १.३५ लक्ष टन कोळसा पुरवठा

* पावसाळा संपल्यावर कोळसा पुरवठ्यात सुधारणा

* बंद संच टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात येणार

-----------

वीज केंद्र आजची निर्मिती

औष्णिक : ५८२० मेगावॉट

जल विद्युत : १९७८ मेगावॉट

वायू विद्युत : २३२ case

आज सायंकाळी ७ वाजता राज्याची मागणी २०, ८५८ मेगावॉट तर सर्व स्रोतांतून वीजनिर्मिती १४,२८० मेगावॉट

उर्वरित ६, ५५० मेगावॉट सेंट्रल काढून घेऊन गरज भागविली जात आहे.

Related Stories

No stories found.