भोंगा प्रकरण तर दंगली घडवण्याचा कुटील डाव

राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाने मंदिरांच्या कार्यक्रमांना देखील झळ बसली.
भोंगा प्रकरण तर दंगली घडवण्याचा कुटील डाव
NCP Leader Eknath KhadseSarkarnama

जळगाव : येणाऱ्या निवडणुका (Elections) डोळ्यापुढे ठेऊन भोंगा हा विषय पुढे रेटण्याचे काम काही काही पक्ष (Political parties) करीत आहे. सातत्याने असली आंदोलने महाराष्ट्रात (Maharashtra) निर्माण केली जात आहे. भोंग्यांचा विषय तर दंगली घडवण्याचा कुटील डाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.

NCP Leader Eknath Khadse
फडणवीसांनी ओबीसी, मराठ्यात लावली भांडणे

श्री. खडसे यांनी पत्रकारांना सांगितले की, असे विषय अतिशय खेदजनक आहेत. आपण त्याकडे दुर्लक्ष करून शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, असे प्रयत्न करावेत.

NCP Leader Eknath Khadse
नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

ते म्हणाले, कायदा सर्वांना सारखाच असतो. हिंदू धर्मामध्ये काकड आरती आपण लाऊडस्पीकरवर लावतो. ती लावण्याचा अधिकार आपल्याला आहे. जसे हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार प्रत्येक हिंदूला आहे. त्याला कोणी नाही म्हणत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत काही मर्यादा आखली आहे, तरते आपल्या हातात नाही. त्या निर्णयाचे आपण पालन केले पाहिजे असे मला वाटते.

भोंग्यावर जे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, असे राजकारण सतत निर्माण केले जात आहे. मध्यंतरी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रकरणावर आठ दहा दिवस गेले. राणा दाम्पत्याच्या राजकारणावर आपले काही दिवस गेले. या माध्यमातून आता जे भोंग्याचे राजकारण सुरु आहे, ते आपले जे मुळ विषय आहेत त्यापासून दूर नेण्याचा हा प्रकार आहे. महागाई, खतांच्या किमीत वाढल्या, जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे.

श्री खडसे पुढे म्हणाले, आगामी निवडणुका विचारात घेऊन हे राजकीय हेतूने केलेले आंदोलन आहे. शेवटी नियमाने, कायद्याने जे सांगितले आहे की, रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत तुम्हाला लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही, ध्वनीची तीव्रता ५५ डेसीबल पेक्षा अधिक असता कामा नये. जे सर्वोच्च न्यायालयाने जे ठरवून दिले आहे. हा निर्णय मशिदींनाही लागू होतो व मंदिरांना देखील लागू होतो. असे असताना उगाचच समाजात तेढ निर्माण करणे हे योग्य नाही. आंदोलन करून दंगली घडवणे यामागे काही तरी कुटील डाव दिसतो आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.