मंत्रीपद नसल्यास चिमणराव पाटील यांची वाटचाल कठीण?

एरंडोल तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची भुमिका ‘वेट ॲन्ड वॉच’.
Chimanrao Patil
Chimanrao PatilSarkarnama

आल्हाद जोशी

एरंडोल : आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड केले. मात्र अद्याप शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांनी उघडपणे साथी दिलेली नाही. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. आमदार पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास पदाधिकारी त्यांच्या समवेत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. (Local leaders will clear there stand after cabinet expansiononly)

Chimanrao Patil
दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Chimanrao Patil
निसर्ग भरभरून पाऊस दिला...व्यवस्था मात्र कर्मदरिद्री...

शिवसेनेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडात आमदार चिमणराव पाटील पहिल्या दिवसापासून सहभागी झाले आहेत. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन दिल्यामुळे तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार चिमणराव पाटील यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या विजयोत्सव कार्यक्रमात देखील अनेक पदाधिकारी उपस्थित राहिल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना निष्ठावान शिवसेना पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून आमदार पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असले तरी मंत्रिमंडळ जाहीर होईपर्यंत कोणतीही भूमिका घ्यायची नाही, अशी भूमिका घेतली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांचा राजकीय, सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात निश्‍चित समावेश होईल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार चिमणराव पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार चिमणराव पाटील यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

मतदारसंघाला भरीव निधी

आमदार चिमणराव पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक असून, एका वर्षात शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. शहरात सुमारे ५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, अनेक कामांना सुरवात झाल्यामुळे शहर व गावाच्या विकासासाठी आमदार पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in