Satyajeet Tambe Bjp Support News : तांबेंच्या पाठिंब्याबाबत विखे-पाटलांचे मोठे विधान; ‘तो निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा’

भाजपने उघडपणे पाठिंब्याची घोषणा केली नसली तरी या मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील भाजपची यंत्रणा तांबे यांच्यासाठी सक्रीय झाल्याचे मानले जात आहे.
Satyajeet Tambe : Radhakrishna Vikhe Patil
Satyajeet Tambe : Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

मुंबई : नाशिक (Nashik) पदवीधर मतदासंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा (support) देण्याचा निर्णय भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि त्यांनी लोकांना मतदानाबाबत आवाहन करायला सुरूवात केली आहे, असे विधान भाजपचे नेते तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे. (Local activist's decision to support Satyajeet Tambe : Radhakrishna Vikhe Patil)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना भाजपचा विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याची चर्चा तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यापासून सुरू आहे. मात्र, भाजपने उघडपणे पाठिंब्याची घोषणा केली नसली तरी या मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून तांबे यांच्याबाबत सकारत्मक बोलले जात आहे. त्यामुळे तांबे यांच्यासाठी भाजपची यंत्रणा सक्रीय झाल्याचे मानले जात आहे.

Satyajeet Tambe : Radhakrishna Vikhe Patil
Santosh Bangar News : प्राचार्याला मारहाण करणे भोवले : आमदार संतोष बांगरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

तांबे यांच्या पाठिंब्याबाबत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा आहे, असे नाही. त्यांसदर्भात लोकांमध्ये संदिग्धता आहे. काय करायचे आणि काय करायचे नाही, यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. स्थानिक कार्यकर्ते जी भूमिका घेत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांच्या पाठिंब्याबाबतची भूमिका घेतली आहे आणि लोकांना आवाहन करायला त्यांनी सुरूवात केलेली आहे.

Satyajeet Tambe : Radhakrishna Vikhe Patil
Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांनी सांगितले अपक्ष निवडणूक लढविण्याचे कारण...

दरम्यान, भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही सत्यजित तांबे यांच्याबाबत स्थानिक उमेदवार म्हणत पाठिंब्याबाबत सूतोवाच केले होते. तसेच, खासदार सुजय विखे पाटील यांनीही तांबे हे नगरमधील स्थानिक उमेदवार आहेत. त्यांच्याबाबत पदाधिकारी-कार्यकर्ते सकारात्मक आहेत, असे विधान केले होते. त्यामुळे भाजपची यंत्रणा तांबे यांच्यासाठी सक्रीय झाल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com