काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून रंगली खडाजंगी

पक्षाचे निरीक्षक डॉ. चंद्रभूषण यांनी स्वार्थ बाजूला ठेवून काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन केले.
Dr Pramodkumar Chandrabhushan
Dr Pramodkumar ChandrabhushanSarkarnama

नाशिक : जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीतर्फे पक्षांतर्गत निवडणुकीबाबत शनिवारी बैठक झाली. यावेळी पक्षाला बदनाम करणाऱ्या भाजप (BJP) सरकारचा निषेध करण्यात आला. तळागाळात काम करणाऱ्यांना पक्षांतर्गत पदांवर संधी देण्यासाठी निवडणूक प्रक्रीया सुरु करण्यात आल्याचे डॉ. प्रमोदकुमार यांनी सांगितले. मात्र या वेळी बैठक रंगली ती तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटांतील जोरदार खडाजंगीने. (two frictions dispute In Nashik congress meeting)

Dr Pramodkumar Chandrabhushan
युवक काँग्रेसच्या भाजप विरोधात ‘बेधडक आंदोलन’

बैठकीसाठी जिल्हा निरिक्षक डॉ. प्रमोदकुमार चंद्रभूषण उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते.

Dr Pramodkumar Chandrabhushan
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना शिवसेनेकडून धोबीपछाड!

बैठकीत तालुकाध्यक्ष निवडणूक ही एकमताने करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी पक्षात काम करणाऱ्या ज्येष्ठांनी तरुणांना संधी उपलब्ध करावी. जिल्ह्यातील ही परंपरा कायम राहिली आहे. जिल्ह्यात आजवर एकमताने तालुकाध्यक्ष निवडीची परंपरा राहीली आहे. ती कायम ठेवावी असे आवाहन केले.

जुना वाद उफाळला

बैठकीत तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटांत जोरदार खडाजंगी झाली. ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही नवा जुना वाद उफाळून आला. प्रकरण प्रथम हमरीतुमरीवर व नंतर हातघाईवर आले. परंतु, ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी समजूत घालून वाद वाढू दिला नाही.

बैठकीत माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल आहेर, ज्ञानेश्वर गायकवाड, संपत सकाळे, संदीप गुळवे, भास्कर गुंजाळ, प्रा. अनिल पाटील, जनार्दन माळी, गुणवंत होळकर, गोपाळ लहामगे, संपत वक्ते, रतन जाधव, प्रकाश अडसरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले तालुका निरीक्षक डॉ. अरुण शिरसाट (सुरगाणा), जेम्स अंबिलढगे (येवला), अशोक खलाणे (निफाड), भाऊसाहेब जगताप ( त्र्यंबकेश्वर), अमजद पटेल (चांदवड), सखाराम मोरे (कळवण), अहमद हुसैन चौस (दिंडोरी) आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेश चिटणीस रमेश कंहाडोळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर काळे यांनी आभार मानले.

----------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com