Dilip Bankar
Dilip BankarSarkarnama

भले सरकार बदलू दे; विकासाची गंगा सुरूच राहणार!

पिंपळगाव बसवंत-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार दिलीप बनकर यांनी दिला दिलासा

पिंपळगाव बसवंत : शरद पवार साहेब, (Sharad Pawar) अजित पवार, (Ajit Pawar) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच -तीन वर्षात तालुक्यात जवळपास पाचशे कोटीचा निधी आणून गेल्या दहा वर्षात झाली नाहीत एवढी कामे या काळात करता आली. सत्ता बदलली तरी विकासगंगा सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी केले आहे. (MLA Dilip Bankar confident about devolopment)

Dilip Bankar
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलास देत नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन केले.

Dilip Bankar
सत्तांतराचे परिणाम... चांगल्या अधिकाऱ्यांच्याही होताहेत बदल्या!

श्री. बनकर पुढे म्हणाले, विकासकामे करताना तालुक्यातील प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एकही गाव विकासकामांपासून वंचित राहिले नाही. यापुढील काळात पक्षाची राज्यात सत्ता नसली तरी विकासकामांचा धडका सुरूच राहणार आहे. विकासाचा अनुशेष बाकी असेल त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला तर ती कामे मार्गी लावण्याची जबाबदारी माझी राहील.

ते पुढे म्हणाले, जी जी कामे विधिमंडळात एकमताने मंजूर झाली आहेत, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. नांदुरमध्यमेश्वरच्या वाढीव गेटचे काम, सायखेडा नदीवरील पूल ही कामे लवकरात लवकर सुरू करून ती पूर्ण केले जातील. सत्ता नसल्यामुळे काही कामे करताना अडचणी येतीलही पण नागरिकांना व्यक्तिगत काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आगामी काळात अनेक निवडणुकीचे वारे वाहातील. त्यात भक्कमपणे उभे राहण्याचे पाठबळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे असेल अशी ग्वाही देतो.

तालुका पाठिशी राहील

‘बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाच्या अधिकाराबाबत शासनाला जो निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या, पिंपळगाव बाजार समितीचे कामकाज पारदर्शक व स्वच्छ असल्याने त्याची ओळख आशिया खंडात आहे, त्यामुळे या कामाची पावती मतदानाची रूपाने मतदार निश्चितच आपल्याला देतील. भविष्यात देखील तालुका माझ्या पाठिमागे राहील असा मला विश्‍वास आहे असे आमदार बनकर यांनी सांगितले.

वर्चस्व बनकरांचेच राहणार

तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे म्हणाले, गेल्या अडीच तीन वर्षातील विकासकामे आणि मागील दहा वर्षातील विकासकामे यांची तुलना जरी करायची ठरली तरी ती होणार नाही. कोणालाही वाटत नव्हते एवढा निधी आमदार बनकर यांनी या काळात खेचून आणला. विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठिमागे हा तालुका गंभीरपणे उभा राहतो, त्याप्रमाणे आमदार बनकरांच्या पाठिमागे तालुका गंभीरपणे उभा आहे. आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, पिंपळगाव बाजार समिती आदी निवडणुकीत आमदार बनकरांचेच वर्चस्व राहिल असा विश्वास डोखळे यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, सोपान खालकर, भूषण धनवटे, भूषण शिंदे, विलास बोरस्ते, गोकुळ निंबाळकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. सुरेश कमानकर, निवृत्ती धनवटे, सुरेश खोडे, विठोबाराजे फडे, संपतराव विधाते, राजेंद्र बोरगुडे, सागर कुंदे, शिवाजी ढेपले, सिद्धार्थ वनारसे, महिला अध्यक्षा अश्विनी मोगल, माधव ढोमसे, रामभाऊ माळोदे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com