`जुने सोडा, आता नवीन राणे आणि नवीन भुजबळ आहेत`

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज झाले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : मी ओबीसी बांधव, भगिनींसाठी फार बोलतो. त्यांच्या आरक्षणवर गंडातर आले त्यासाठी बोलतो. यासंदर्भात माझं तोंड कोणीही बंद करु शकत नाही. नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रेम दाखविले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र आता आता नवीन राणे आणि नवीन भुजबळ आहेत. जुने काय ते सोडून द्या, असे प्रतिपादन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

यावेळी, नवाब मलिक काय बोलले हे मला माहीत नाही. मात्र ते जे बोलतात, त्याबाबत यांच्याकडे कागदपत्रं असतील. कागदपत्र असतात म्हणूनच ते बोलतात, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
पंकजा मुंडे म्हणाल्या, `दिड मिनीटे बोलणार होते, मात्र आता एकच मिनीट बोलणार`

ते म्हणाले, सहकार हे काही माझे क्षेत्र नाही. (Co-operative is not my field) कशाला इतरांची अडचण म्हणून मी कोणत्याही संस्थेवर पदाधिकारी नाही. ते माझं क्षेत्रच नसल्याने मी कोणत्याही संस्थेवर जात नाही.

येथील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एका व्यासपीठावर होत्या. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, वसंत गिते. बॅंकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक, गौतम ठाकूर, आमदार माणिकराव कोकाटे, महापौर सतीश कुलकर्णी, पंढरीनाथ थोरे, कोंडांजीमामा आव्हाड, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
शिवसेना नाशिकला एकहाती सत्ता घेईल...त्यासाठी बूथप्रमुखांनी सर्वस्व पणास लावावे!

`माझ्याकडे अनेक कार्यकर्ते येतात, आम्ही निवडणुकीत तुमचं काम केल आहे. त्यामुळे आम्हाला कामाला लावा असे सांगतात. मात्र मला ते जमत नाही` ते म्हणाले, आज या कार्यक्रमात माझ्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही माझ्या मित्रांचे मुलं आहेत. एकीकडे पंकजा मुंडे आणि दुसरीकडे गौतम ठाकूर आहेत. मुंबईच्या एमईटी संस्थेचा भुखंड खरेदी करण्यासाठी मी माझं राहत घर तारण ठेवलं होतं. मला पहिला चेक सारस्वत बँकेने दिला होता. काही दिवसांपूर्वी इथं प्रशासक मंडळ नियुक्त झालं. काही वेळेस खरी, खोटी बालंट येतात. त्याचा त्रास होतो. नंतर मात्र न्याय मिळतो. मला याचा अनुभव अनुभव आहे. आमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे, तीथे सध्या प्रशासक नियुक्त झाले आहेत. सगळे प्रशासक वाईट नसतात. तसे चांगले देखील नसतात.

ते म्हणाले, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याबाबतच्या चौकशी व तक्रारींचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. आधी ते न्यायालयात गेले. तीथे त्यांनी आपले म्हणने मांडले. आता ते बाजु मांडण्यासाठी `ईडी`च्या कार्यालयात गेले आहे. वेगवेगळ्या न्यायालयात गेले, पण आता आपली बाजू मांडण्यासाठी `ईडी`च्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तीथे काय होते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com