स्पर्धा करायचीच तर विकासाची करा!

धरणगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष नीलेश चौधरी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
Water supply minister Gulabrao Patil, Gulabrao Patil Latest News,
Water supply minister Gulabrao Patil, Gulabrao Patil Latest News, Sarkarnama

धरणगाव : शहराच्या (Dharangaon) इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असणारी पाणीपुरवठा योजना सुरू होत आहे. यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे. यावर टीका करणारे तोंडघशी पडले असून, त्यांनी स्पर्धा करावी, मात्र ती विकासकामांची (Devolopment) करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. (Gulabrao Patil Latest News)

Water supply minister Gulabrao Patil, Gulabrao Patil Latest News,
नारायण राणेंना दिलासा... धुळे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

येथे २७.४४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच शहरातील सर्व जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, दोन भव्य जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठी पालिकेवर १० टक्के रकमेचा पडलेला भारही आपण शासनाकडून अन्य योजनेतून मंजूर करून आणू, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विरोधकांनी घाण राजकारण सोडून विकासयात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Water supply minister Gulabrao Patil, Gulabrao Patil Latest News,
देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ईमेलवरील निमंत्रण!

शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, गटनेते पप्पू भावे, वासुदेव चौधरी, विजय महाजन, माजी नगराध्यक्ष उषा वाघआदी उपस्थित होते.

धरणगावला मुबलक पाणी

पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव पालिकेसाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २७.४४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. यात धावडा येथील पाण्याची उचल करण्यापासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे.

प्रारंभी शासकीय आयटीआयपासून शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रवेशद्वाराचे भूमिपूजन झाले. पाटावरील पुलाचे भूमिपूजन, गोशाळेजवळ पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. जी.एस.नगर येथील श्री लॉन्समध्ये हा कार्यक्रम झाला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com