Shocking News: चंद्रकांत पाटील विरोधी आंदोलनात शाळेची बस आणि विद्यार्थी

संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापकांसह ६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Agitation at Jalgaon
Agitation at JalgaonSarkarnama

जळगाव : भाजप (BJP) नेत्यांसह राज्यपालांनी (Governer) केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चासह विविध संघटनांतर्फे जळगाव (Jalgaon) शहरात मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यात इकरा शिक्षण संस्थेच्या बसद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करून गैरवापर केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह आंदोलकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) झाला आहे. (Police files fir against 69 activists of Jalgaon)

Agitation at Jalgaon
Sureshdada Jain news; भव्य स्वागतामुळे जळगावात पुन्हा सुरेशदादा जैन पर्व?

राज्यपाल भगतसिंह कोशियारी, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी, रावसाहेब दानवे व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून लोकसंघर्ष मोर्चा, जनक्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलने करण्यात आले.

Agitation at Jalgaon
Sanjay Raut News; अंधारेंवर बोलणारे राज्यपालांविषयी गप्प का?

आकाशवाणी चौकातील आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्यावर आंदोलकांनी बांभोरी पुलाकडे धाव घेतली. मात्र, वाटेतच त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करून व गुन्हा दाखल करून जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामिनावर मुक्त केल्यानंतर पुन्हा आंदोलकांनी रास्ता रोको करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वेठीस धरली. या आंदोलनात इकरा शिक्षण संस्थेच्या स्कूल बस (एमएच ४८, बीएम ५३०९) द्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना इच्छाविना सहभागी करून घेण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार (वय ७०, रा. काट्याफाईल), रमेश माणिक पाटील (रा. आव्हाणी), भाऊसाहेब सुकदेव सोनवणे (वय ४०, रा. भोकर), योगेश दत्तात्रय पवार (३२, रा. आव्हाणी), नरेश राजेंद्र पाटील (३३), राकेश रमेश पाटील (२८, रा. दादावाडी) यांच्यासह एकूण ६९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक मोहन सायकर तपास करीत आहेत.

महिलांची ‘खाकी’ला दया

आंदोलनात आदिवासी भागातील महिलांनाही सहभागी करून घेतले होते. या अशिक्षित महिलांना कलम- १५९ची साधी नोटीस देत पोलिसांनी रवाना केले. मात्र, नेहमी आंदोलने करणाऱ्या महिला आणि उच्च शिक्षित महिलांना दाखल गुन्ह्यात समाविष्ठ करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com