Ahmednagar : राज्यात राजकीय धुमशान; अन् नगरमध्ये भाजप, काँग्रेस, शिंदे - ठाकरे गटाच्या नेत्यांनी धरला लेझीमवर ठेका

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
Ahmednagar Politics
Ahmednagar PoliticsSarkarnama

Ahmednagar News : अहमदनगर शहरात शिवजयंती मिरवणुका उत्साहात संपन्न झाल्या. मात्र, मिरवणुकीत चर्चा झाली ती काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे), भाजपच्या युवा नेत्यांच्या एकत्र येण्याची.

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवा सेनेचे राज्यसचिव विक्रम राठोड आणि भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी चितळ रोडवरील शिवालयासमोर भव्य शिवजयंती मिरवणुकीत लेझीमवर ठेका धरला.

हे तीनही युवा नेते एकत्र आल्यामुळे याची चांगलीच चर्चा शहराच्या बाजारपेठेत सकाळी पाहायला मिळाली. यावेळी बाजारपेठेतील वातावरण भगवेमय झाले होते.

Ahmednagar Politics
Amit Shah News : विश्वासघात करणाऱ्यांना कधीही माफी नसते; अमित शाहंनी स्पष्टच सांगितलं..

यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा, शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Ahmednagar Politics
MNS : ..पक्षाचं नाव गेलं..; राज ठाकरे नावाविषयी म्हणाले, "बाळासाहेबांनी मला बोलवलं..

या मिरवणुकीत विविध शाळा, महाविद्यालय यांच्यासह संघटना पक्ष यांचे देखावे सहभागी झाले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या शाळा आणि महाविद्यालयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे सादरीकरण केले. नगरकरांनी त्याला भरभरून दाद दिली. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते.

Ahmednagar Politics
By-elections News : ''कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल अमित शाहांनी हेरला;'' म्हणूनच त्यांनी प्रचार...

दरम्यान, काँग्रेसचे किरण काळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) विक्रम राठोड आणि भाजपचे सुवेंद्र गांधी यांनी शिवजयंती मिरवणुकीत लेझीमवर ठेका धरला. या तीनही युवा नेत्यांनी एकत्र आल्यामुळे याची चांगलीच चर्चा शहराच्या बाजारपेठेत सकाळी पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com