जि. प. पराभवानंतर विजयकुमार गावितांचा भाजपवरच बॅाम्ब !

नंदुरबारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे अकरा पैकी जिल्हा परिषद सात सदस्य होते.
Dr Vijaykumar Gavit
Dr Vijaykumar GavitSarkarnama

नंदूरबार : नंदुरबारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे अकरा पैकी जिल्हा परिषद सात सदस्य होते. (BJP had 7 members out of 11 In Nandurbar before election) आज जाहीर झालेल्या निकालात पक्षाला केवळ एक सदस्य विजयी झाला. (Party`s only one member win) हा निकाल धक्कादायक आहे. (Result is Shocking) नेत्यांतील बेबनावामुळेच भाजपची पिछेहाट झाली, अशी नाराजी माजी मंत्री व भाजपचे नेते डॅा विजयकुमार गावित (Dr Vijaykumar Gavit) यांनी व्यक्त केली.

Dr Vijaykumar Gavit
जि.प. सदस्य ते खासदार सबकुछ विजयकुमार गावितांच्या घरात!

नंदूरबारमध्ये भाजपच्या सुप्रिया गावित या एकमेव उमेदवार विजयी झाला. त्या देखील डॅा गावित यांच्या कन्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यावर टिका केली. हा पराभव पक्षनेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात डॅा गावित म्हणाले, भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलाहामुळेच भाजपचा पराभव झाला असुन पक्षातील जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि पदाधिकारी यांच्या नसत्या उद्योगामुळेच जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Dr Vijaykumar Gavit
रितेश- जेनेलिया रमले नाशिकच्या बाळ येशूच्या दारी!

जिल्‍हा परिषदेमध्ये आजच्या निकालानंतर भाजपला ४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. गत वेळेस या ११ पैकी ७ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले होते. तर दुसरीकडे शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये देखील भाजपची पिछेहाट झाली. तरीही या दोन्ही पंचायत समित्या भाजपच्या हाती राहतील, असा अजब दावा देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान यासंदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेचा केवळ एका जागेवर निसटता पराभव झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, नंदुरबार तालुक्‍यात पाच जागेवर निवडणुक होती. फक्‍त एका जागेवरच शिवसेनेचा निसटता पराभव झाला. परंतु, भाजपचे खासदार, आमदार, माजी आमदार असलेल्‍या गावित परिवाराला फक्‍त स्वतःच्या मुलीलाच विजयी करता आले. पक्षाच्या अन्‍य कोणत्‍याही उमेदवारांना ते निवडून आणू शकले नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com