देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवशी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!
Dy. C. M. Ajit PawarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी आपल्याला एक कार्यक्रम दिला आहे. त्यात प्रत्येक शनिवारी आपण आपल्या गावात जायचे आहे. गावात जा, पण माझं एक सांगणे आहे. किमाना गावातला सरपंच तरी आपल्या विचाराचा असावा याची दक्षता घ्या, असे प्रतापादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

Dy. C. M. Ajit Pawar
भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने शिवसेना का झाली अस्वस्थ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे उप सभापती नरहरी झिरवाळ व राज्याच्या मंत्रीमंडळातील विविध सहकारी उपस्थित होते.

Dy. C. M. Ajit Pawar
`त्या` निर्णयाने एकनाथ खडसेंचे नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दोन्ही सिद्ध झाले!

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार व ताकद वाढविण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे आहे. साहेबांना उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य लाभावे. साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढावी. त्यांचा वाढदिवस हा जाणता राजाचा वाढदिवस आहे. त्यादृष्टीने हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे. शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागिरकांच्या व महाराष्ट्राच्या जाणत्या नेत्याचा, शेतकऱ्यांच्या पाठीराख्यांचा, वंचित, उपेक्षितांसाठी लढणाऱ्यांचा व आदिवासी, मागासवर्षीयांसाठी लढणाऱ्यांचा हा वाढदिवस, जाणत्या राजाचा वाढदिवस आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो.

ते म्हणाले, आपल्याला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आत्ताच बोलताना एक कार्यक्रम सांगितला, की प्रत्येक शनिवारी आपण आपल्या गावी जावे. जे कोणी आता पहिल्या शनिवारी आपल्या गावात जाती, त्यांना माझे सांगणे आहे. त्यांनी आपल्या गावात किमान सरपंच तरी आपल्या विचाराचा असावा. अन्यथा सरपंचच आपले ऐकत नाही, असे व्हायचे.

ते म्हणाले, शरद पवार हे एक विद्यापीठ आहे. माझ्या संपूर्ण राजकीय वाटचालीत, जडण, घडणीत माझ्यावर त्यांचेच संस्कार आहेत. पवार साहेबांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावे. विशेषतः युवकांपर्यंत पोहोचवावेत. शरद पवारांच्या कार्याचा प्रत्येक क्षेत्रावर त्यांच्या कामाचा ठसा आहे. त्यांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. राजकारणाबरोबरच इतर विविध क्षेत्रात त्यांचा वावर आणि सर्वांवर बारकाईने लक्ष, सामाजिक बांधिलकीसाठी प्रोत्साहन त्यांनी दिले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in