Shivsena News: रस्ता दुरुस्ती करण्यास शासनाला भाग पाडू

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन देण्यात आले.
Ambadas Danve with Shivsena workers
Ambadas Danve with Shivsena workersSarkarnama

इगतपुरी : टाकेद (Igatpuri) गटातील विविध प्रश्नांबाबत खंडेराव झनकर (Khanderao Zankar) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना निवेदन दिले. यासंदर्भात इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाला (State Government) भाग पाडू, असे दानवे यांनी सांगितले. (Memorandum give to Shivsena leader Ambadas Danve for roads)

Ambadas Danve with Shivsena workers
NCP News: बावनकुळे यांनी आधी आपली राजकीय उंची तपासावी!

पिंपळगाव मोर (इगतपुरी) ते वासाळी फाटा रस्ता शासनाच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यांसह शेवटची घटका मोजत आहे. या भागातील नागरिक या कारभाराला कंटाळले असून, त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणून या रस्त्याची दसरा- दिवाळीपूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

Ambadas Danve with Shivsena workers
BJP News: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा!

तालुक्यातील फळविहीरवाडीतील बंधारा पावसाने वाहून गेला. यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतातील पिके वाहून गेली. यासह टाकेद गटात शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टाकेद गटातील सर्व गावांत सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. कातकरी वस्त्यांचे सर्वेक्षण करून सर्व कुटुंबांना हक्काचे घरकुल बांधून द्यावे, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उन्नती करावी, त्यांच्या रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगाराची व्यवस्था करावी, विविध समस्या जाणून घेऊन शासन दरबारी आवाज उठवावा, अशा मागण्या निवेदनात केल्यात आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पिंपळगाव मोर रस्ता, फळविहीरवाडी बंधारा प्रकरण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, कातकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत सर्वांगीण माहिती घेऊन शासनाला दखल घ्यायला भाग पाडू, असा शब्द दिला. त्यामुळे खंडेराव झनकर यांनी श्री. दानवे यांचे आभार मानले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, उप तालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, टाकेद गटप्रमुख साहेबराव झनकर, भिमराव साबळे, बाळासाहेब घोरपडे, कैलास गाढवे, सुदाम भोसले, शिवाजी काळे, शिवाजी गाढवे, बहिरू केवारे, पप्पू लहामगे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in