मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!

नाशिकच्या एसीबी पथकाने तीन दिवसांत लाचखोरीचे दोन ट्रॅप यशस्वी!
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!
API Pranita PawarSarkarnama

नाशिक : ती फॅशनेबल चष्मा, हाय फाय ड्रेस अन् स्मार्ट पोलिस म्हणून मिरवायची. मनसेच्या आंदोलक महिलांना (Women) पकडल्यावर तीने पोझ देत फोटो काढले होते. मात्र आज ती वीस हजाराची लाच घेतावा `एसीबी`च्या (ACB) जाळ्यात अडकली. नाशिक (Nashik) पोलिसांत सलग दुसऱ्या दिवशी दोन घटना घडल्याने वरिष्ठ अधिकारी संतप्त झाले आहेत. (lady police officer arrest by ACB while taking 20K Bribe)

API Pranita Pawar
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील?

नाशिक शहर पोलीस दलात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून दोन दिवसात सलग दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार या स्मार्ट पोलिस म्हणून मिरवून घेत असत. हायफाय ड्रेस, चष्मा अन् स्टाईलने मिरवणारी ही अधिकारी आज सकाळी तक्रार अर्ज निकाली काढायचा म्हणून वीस हजाराची लाच घेताना जाळ्यात अडकल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

API Pranita Pawar
बापरे, फडणवीसांच्या त्या घोषणेने मी खुपच घाबरले!

काल आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले आहे. हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकारांलची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.

या लाच प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसउप अधीक्षक वैशाली पाटील यांनी पोलिस अधीक्सुषक नील कडासने व अपर पोलिस अधीक्जेंषक नारायण न्द्रयाहाळदे यांच्या मार्गदर्सनाखाली ही कारवाई केली. त्यात राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरूड, प्रकाश महाजन यांनी ही कारवाई यशस्वी केली.

एकीकडे गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल बदली करण्यात आली होती.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in