Shivsena: शिंदे गटाच्या प्रविण तिदमे यांना दिलासा; शिवसेनेला धक्का!

नाशिक महापालिका कामगार सेनेच्या नेतृत्वावरून शिंदे गट व शिवसेनेतील वाद मिटेना.
Sudhakar Badgujar & Parvin Tidme
Sudhakar Badgujar & Parvin TidmeSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे (Pravin Tidme)यांची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतून (Municiple Empolyees & Workers Sena) हाकालपट्टी करण्यात आली होती. यासंदर्भात तिदमे यांना कामगार उपायुक्तांनी (Labour Commissioner) दिलासा दिला आहे. संघटनेने सादर केलल्या गतवर्षीच्या हिशेबपत्रानुसार श्री. तिदमे अध्यक्ष असल्याचे पत्र कामगार विभागाने महापालिका आयुक्तांनी दिला आहे. (Labour commissioner given relief to Eknath Shinde Group`s Pravin Tidme)

Sudhakar Badgujar & Parvin Tidme
Dr. Neelam Gorhe: भाजप शिंदेंची काय अवस्था करील, याचा त्यांनी विचार करावा!

याबाबत श्री. तिदमे यांनी आपणच संघटनेचे अध्यक्ष आहोत. आपली हाकालपट्टी नियमबाह्य आहे. त्या विरोधात कामगार उपायुक्तांकडे दाद मागितली होती. या विषयावरून महापालिकेतील शिवसेना व शिंदे गटातील राजकारण चांगलेच पेटले आहे. लवकरच शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करण्यासाठी कामगाराचा मेळावा बोलावला आहे.

Sudhakar Badgujar & Parvin Tidme
भाजपला आव्हान देणाऱ्या `एमआयएम`ला एकनाथ शिंदे ५५८ कोटींचे ‘गिफ्ट’ देतील का?

याअनुषंगाने कामगार उपनिबंधक, श्रमिक संघ यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कार्यालयातील अभिलेख्यांची तपासणी केली असता, श्रमिक संघ अधिनियम १९२६ अंतर्गत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना, नाशिक या संघटनेची कार्यालयात नोंदणी झालेली आहे. उक्त संघटनेच्या घटना व नियमली मधील मुद्दा क्र. २३ अन्वये अध्यक्ष किंवा सरचिटणीस हे त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा संघाच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा बोलनू शकतील. त्यानुसार त्यांना तसे अधिकार आहेत. संघटनेच्या २७ ऑगष्ट २०२२ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या वर्षिक अहवालाचे अवलोकन केले असता, प्रविण सावळीराम तिदमे अध्यक्ष आहेत.

दरम्यान श्री. तिदमे यांचा हा दावा कितपत तग धरेल याबाबत तज्ञांनी संशय व्यक्त केला आहे. कामगार उपायुक्तांकडे नोंदणी असलेल्या प्रत्येक कामगार संघटनेला दरवर्षी हिशेबपत्रके व अहवाल सादर करावा लागतो. त्यात तत्कालीन पदाधिकाऱ्यांची नावे व सह्या असतात. मात्र त्यानंतर काही बदल झाले असल्यास त्याचा उल्लेख त्यात येऊ शकत नाही. सध्याच्या स्थितीत तिदमे यांचा संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली असुन बहुतांश कर्मचारी व पदाधिकारी शिवसेनेसोबत आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com