Good News: रद्दीवाले कुतुबुद्दीन यांनी दिवाळीत वाटली दहा टन साखर!

कुतुबुद्दीन शेख यांचा व्यापार रद्दीचा मात्र काम सोन्यासारखे
Kutubuddin Shaikh
Kutubuddin Shaikh Sarkarnama

नाशिक : ते राजकारणी नाहीत. त्यांना निवडणूक लढवायची नाही. केलेल्या कामाचा प्रचारही नको आहे. त्यांचा नाव आहे कुतुबुद्दीन शेख. (Kutubuddin Shaikh) व्यापार रद्दीचा. (Scrap Businessmen) मात्र त्यांच्या कामापुढे सोन्याची चमक फिकी पडावी अशी. या शेख यांनी गरिबांची (Needy families) दिवाळी गोड व्हावी यासाठी चक्क दहा टन साखर मोफत वाटली. त्यांचा हा उपक्रम गाजावाजा न करता दहा वर्षे सुरु आहे. (Scrap businessmen doing a work better then 24k gold)

Kutubuddin Shaikh
शिंदे गटामुळे भाजपच्या निवडणूक तयारीत खोडा!

शहरातील गंजमाळ हा झोपडपट्टी, गरिब व हातावर पोट असलेल्यांचा परिसर. काल सायंकाळी येथे गरिब महिला, नागिरकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. अनेकांना त्याचे कुतुहल वाटले. मात्र काय सुरु आहे हे कळत नव्हते.

Kutubuddin Shaikh
मतदान झाले तर शिंदे गटाला ५० मतेही मिळणार नाहीत!

या गर्दीत गेल्यावर जे पाहिले त्याने माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. कुतुबुद्दीन शेख हे रद्दीचे व्यापारी आहेत. ते त्यांच्या दुकानावर गरिबांनी प्रत्येकी कुटुंबासाठी पाच किलो साखर मोफत वाटप करीत होते. कोणताही गाजावाजा नाही. गडबड गोंधळ नाही. प्रचार नाही. सर्व शांततेत सुरु होते. स्वतः श्री. शेख, त्यांचे चिरंजीव रझ्झाक शेख व अन्य सहकारी त्यांना त्यांच्या कामात मदत करीत होते. समोरच खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यालय असल्याने त्यांनी गोडसे यांनाही निमंत्रीत केले होते. सर्व मिळून प्रकाशाच्या उत्सवात गरिबांच्या जीवनात साखरेचा गोडवा पेरत होते. घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे प्रतिबिंब उमटत होते.

श्री. शेख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ही तर सेवा आहे. त्याचा काय प्रचार करायचा. कशाला माहिती द्यायची, ही त्यांची प्रतिक्रीया होती.

याबाबत त्यांचे चिरंजीव रझ्झाक शेख म्हणाले, आमचे वडील समाजसेवा म्हणून हे काम करतात. त्याचे सर्व त्यांचेच आहे. यामध्ये कोणताही भेदभाव, धर्माचा अडसर नसतो. गेले दहा वर्षे ते दिवाळीला दहा टन साखर वाटतात. एका कुटुंबाला पाच किलोचे पाकीट दिले जाते. रमझान ईदला ते गरिब समाज बांधवांना प्रत्येक निश्चित रक्कम देतात. जे जे येतील त्याला मदत केली जाते. त्याची मोजदाद ठेवली जात नाही. गेले दहा वर्षे दिवाळी आणि ईदला हा उपक्रम सुरु आहे.

खासदार गोडसेंची चर्चा

दिवाळीत या रांगा पाहिल्यावर त्याचे राजकारण न झाले तरच नवल. शेख यांच्या दुकानासमोरच शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे संपर्क कार्यालय आहे. त्यामुळे या रांगा पाहिल्यावर एका राजकीय नेत्याने गोडसे साखर वाटत आहे, असे कळवले. याबाबत खासदार गोडसे यांच्याशी संपर्क केल्यावर `मी नाही तर रझ्झाकभाई हे काम करतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तीथे गेलो होतो. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेव्हढे थोडे` असे स्पष्ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in