क्षीरसागर- आबिटकरांनी कोल्हापूरात झोप उडवलीय...

बंडखोरांमागे कोणी शिवसेना कार्यकर्ते, नेते गेेले नाही, सगळे भक्कमपणे शिवसेनेतच राहणार.
क्षीरसागर- आबिटकरांनी कोल्हापूरात झोप उडवलीय...

कोल्हापूर : जिल्ह्यातील (Kolhapur) शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळालेले व सध्या शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झालेले शिरोळ मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कट्टर कार्यकर्ते, त्यातही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध. ते २०१४ लाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते, पण ते पराभूत झाले. या शहराचा इतिहास पाहता बंडखोरांनी कोणताही झेंडा हाती घेतला तरी त्यांना विजय सोपा नाही. (Politics & Future both in daek of rebel MLA)

क्षीरसागर- आबिटकरांनी कोल्हापूरात झोप उडवलीय...
मी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांचाच राहीन!

दोन्ही काँग्रेसची २०१९ ला आघाडी झाली, त्यात शिरोळची जागा आघाडीत दुसऱ्या पक्षाला गेल्याने व अन्य पर्याय नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. निकालानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देत मंत्रिपदही मिळवले.

क्षीरसागर- आबिटकरांनी कोल्हापूरात झोप उडवलीय...
उद्धव ठाकरे सरकारचा फैसला उद्याच, राज्यपालांचे आदेश!

राधानगरी मतदार संघाचे दुसरे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नंतर ते काही काळ सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले, पण २००९ मध्ये ते अपक्ष रिंगणात उतरले, त्यावेळी पराभूत झाले. २०१४ त्यांनाही आघाडी अंतर्गत जागा न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकारला आणि ते पहिल्यांदा आमदार झाले, २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावरच ते पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले.

तिसरे बंडखोर नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मूळचे कट्टर शिवसैनिक, २००९ ला शिवसेनेत पूर्वीपासून कार्यरत असलेल्यांना डावलून त्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि ते विजयी झाले. ते २०१४ मध्येही उमेदवारी आणि विजय मिळवण्यात यशस्वी झाले. या दोन्हीही निवडणुकीत त्यांना काँग्रेस नेते व सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची मोठी मदत झाली. महाडीक-पाटील वादात पाटील यांनी क्षीरसागर यांना मदत केली. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती असूनही ते पराभूत झाले.

शिवसैनिक रस्त्यावर

क्षीरसागर व आबिटकर यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. क्षीरसागर व दोन्ही जिल्हाप्रमुखांत गेल्या काही वर्षांपासून सख्य नाही, त्याचे प्रतिबिंब या आंदोलनात दिसले. माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी तर त्यांचा फलकावरील फोटो फाडला. आबिटकर यांच्या आजरा येथील संपर्क कार्यालयाची काच फोडण्यात आली. तातडीने नाही पण एक दिवस उशिराच या प्रतिक्रिया उमटल्या. यड्रावकर यांच्या विरोधात मात्र शिवसेना थंड आहे.

अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कार्यकर्त्यांत तसा संभ्रम आहे, पण पक्षाचे दोन्ही खासदार शिवसेनेसोबत असल्याने त्यांना ताकद मिळाली आहे.

पर्याय नाही म्हणून २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी स्वीकारून विजयी झालेले माजी आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर हे पक्षासोबत असले, तरी त्यांच्यापैकी उल्हास पाटील व नरके यांच्यात चलबिचल आहे. बंडखोरांविरोधातील आंदोलनात नरके दिसले नाहीत ही ठळक नोंद.

बंडखोर क्षीरसागर यांना काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, पण तो उघडपणे दिसत नाही. आबिटकर यांनाही फारसा विरोध होताना दिसत नाही, याचा अर्थ त्यांनाही मतदार किंवा शिवसैनिकांचा पाठिंबा आहे असे दिसते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातच पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यातून त्यांच्या विरोधातील धार अधिक तीव्र होताना दिसते.

बंड यशस्वी झाले तर क्षीरसागर यांच्याकडील पद कायम राहील, आबिटकर व यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी आहे, त्यातून हे तिघेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपापल्या भागात आव्हान उभे करू शकतात.

संजय पवार ‘गुड बुक्स’मध्ये

कोल्हापूर उत्तरमधून क्षीरसागर यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख संजय पवार यांची दावेदारी भक्कम असेल. अलीकडेच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार यांना उमेदवारी दिली होती, त्यातून ते मुख्यमंत्र्यांच्या ‘गुड बुक’ मध्ये गेले आहेत.

कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना विजयाचीही संधी आहे. आबिटकर यांच्या विरोधात शिवसेनेत सध्या तगडा उमेदवार कोण दिसत नाही, ऐनवेळी तालुकाप्रमुख किंवा सध्या भाजपच्या सानिध्यात असलेले माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई हेही उमेदवार होऊ शकतात. राज्यमंत्री यड्रावकर यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी निश्‍चित आहे, त्यांना विजय मिळवण्यातही सद्यःस्थितीत अडचण दिसत नाही.

कोल्हापूर उत्तरमधून क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम हे प्रबळ दावेदार आहेत. नुकत्याच झालेल्या या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कदम यांनी चांगले आव्हान उभे केले होते, त्यांना आतापर्यंतच्या भाजप उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा दुप्पट मते घेतली आहेत. आबिटकर यांच्या विरोधात भाजपकडून राहुल देसाई हे उमेदवार होऊ शकतात तर यड्रावकर यांच्या विरोधात सध्या तरी भाजपमध्ये प्रबळ उमेदवार दिसत नाही.

बंडखोर पुन्हा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले तर, यापूर्वीचा कोल्हापूरचा इतिहास पाहता त्यांना विजय सोपा नाही. आबिटकर हे प्रबळ आहेत, पण त्यांना झगडावे लागेल, यड्रावकरांच्या विरोधात सध्या तरी कोणी प्रबळ दिसत नाही, त्यांच्या मतदार संघात जातीचे राजकारण महत्त्वाचे ठरते. कोल्हापूर उत्तर मतदार संघातच क्षीरसागर व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात फारसे सख्य नाही, इतर मतदार संघात तसे चित्र दिसत नाही. पण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात त्यावेळी कोण उतरेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

सद्यःस्थिती

- नव्याने निवडणूक झाल्यास आबिटकरांना झगडावे लागेल

- यड्रावकरांच्या विरोधात भाजपमध्ये सध्यातरी प्रबळ उमेदवार नाही

- बंडखोरीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com