Jalgaon: शिवसेना बंडखोर आमदार किशोर पाटील समर्थनार्थ रॅली

समर्थकांनी मोर्चा काढून दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
Kishor Patil News, Jalgaon News, Shivsena News
Kishor Patil News, Jalgaon News, Shivsena NewsSarkarnama

पाचोरा : शिवसेनेचे (Shivsena) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या समर्थनार्थ पाचोरा व भडगाव (Jalgaon) तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या रॅलीत समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी शहर अक्षरशः दुमदुमले. (Shivsena rebel MLA Anil patil`s follwers rally in Pachora city)

Kishor Patil News, Jalgaon News, Shivsena News
...तर एकनाथ शिंदे ११ दिवसांचेच मुख्यमंत्री!

गुरुवारी सकाळी ‘शिवतीर्थ’ या शिवसेना कार्यालयापासून ढोलताशांच्या गजरात रॅलीस सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, स्वातंत्र्यसैनिक दामोदर महाजन चौक, देशमुख वाडी, आठवडेबाजार, गांधी चौक, जामनेर रस्तामार्गे रॅली काढण्यात आली. आमदार पाटील समर्थनार्थ स्लोगन असलेले फलक उंचावत व गगनभेदी घोषणा देत रॅलीत हजारो समर्थकांनी सहभाग घेतला. यात पाचोरा व भडगाव तालुक्यातील महिलांची संख्या लक्षणीय होती. रॅली मार्गात छत्रपती शिवाजी महाराज व डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(Jalgaon Latest Marathi News)

Kishor Patil News, Jalgaon News, Shivsena News
आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना शिंदे गटाचा इशारा; आमचा व्हिप पाळला नाही तर...

शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. मुकुंद बिल्दीकर, सुमीत पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या अर्धांगिनी सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तेथे लावलेल्या स्क्रीनवर एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांच्यासह आमदार पाटील यांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातील चित्रफित दाखविण्यात आली. सुनीता पाटील यांनी केलेल्या व्यक्त केलेल्या मनोगतामुळे उपस्थित सारेच भावनिक झाले. त्यांच्या मनोगताला साद व दाद देत आमदार पाटील समर्थनार्थ गगनभेदी घोषणाबाजी झाली. आम्ही शेवटपर्यंत आमदार किशोर पाटील यांचे समर्थक असल्याचा जाहीर निर्धार करण्यात आला.

आमदार पाटील यांनी रेकॉर्डिंग केलेल्या मनोगतातून समर्थकांचे आभार व्यक्त करत गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचामुळे शिवसेना आमदारांची फरफट होत होती. विकासकामे व निधीला खीळ बसविण्याचे प्रयत्न केले जात होते. त्यामुळे विकासकामे करून मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने आम्ही केवळ विकासकामे व महाराष्ट्राच्या वैभवासाठी वेगळा गट स्थापन केला.

आम्ही शिवसैनिकच आहोत. शिवसेनेच्या तत्वानुसार चालत राहू, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळीही त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली.

या रॅलीत माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, डॉ. प्रियंका पाटील, मुकुंद बिल्दीकर, किशोर बारावकर, चंद्रकांत धनवडे, युवा नेते सुमीत पाटील, शरद पाटील, जितेंद्र जैन, शिवदास पाटील, पद्मसिंग पाटील, गंगाराम पाटील, गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, योगेश जाधव आदी सहभागी झाले होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com