खडसे साहेबांचे संपूर्ण कुटुंब तूप, लोणी खात आहे

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला, त्यांना सर्व पदे घरातच हवेत.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

तळोदा : जळगाव (Jalgaon) दूध संघावर प्रशासक नेमला गेला आहे, तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊ द्यावी, सर्व काही बाहेर येईलच. राजकीय भावनेने (Political intension) कुठलाही चौकशी प्रेरित नाही. खडसे साहेबांना (Eknath Khadse) सर्व पदे घरातच पाहिजे, त्यांचे संपूर्ण कुटुंब तूप, लोणी खात आहे. तुमच्या रेकॉर्डिंग व पत्रातून सर्व काही सिद्ध होईलच, आत्तापासून तुम्ही टाहो का फोडत आहेत असा टोला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना लगावला. (BJP leader Girish Mahajan criticise NCP leader Eknath khadse)

Eknath Khadse & Girish Mahajan
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक सुरु आहे. यानिमित्ताने राजकीय आरोप, प्रत्यारोपांसह संघाच्या कामकाजाची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी वरील विधान केले.

Eknath Khadse & Girish Mahajan
गावित यांनी एकनाथ खडसेंना चक्क मुख्यमंत्रीच केले?

जितेंद्र आव्हाड प्रकरणी त्यांनी सांगितले की त्यांचे प्रकरण सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. मारहाणीचा अधिकार त्यांना कुणी दिला. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही का, आधी याचा विचार त्यांनी करावा. लोकांनी पाहिले आहे की, महिलेला दोन्ही हात धरून कसे ढकलण्यात आले. त्यामुळे आव्हाडांवरील कारवाई नियमानुसार होत आहे.

मध्यावधी निवडणुका होतील का? या प्रश्नावर, आमच्याकडे १६७ लोक आहेत, त्यामुळे मध्यावधी निवडणुकीचा मुद्दा पूर्णतः हास्यास्पद आहे. आमच्या विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे ते असा गोंधळ निर्माण करीत आहेत. त्यातून काहीही होणार नाही. ते सांगतात तसे काहीच घडणार नाही.

श्री. महाजन म्हणाले, विरोधकांनी दोन वर्षे आता फक्त स्वप्न बघावीत अस सांगत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्रीच बोलतील असे त्यांनी सांगितले. शिंदे गटात आता १३ खासदार आहेत, येत्या दोन-पाच दिवसात पंधरा देखील होतील. आमदार, शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची संख्या पाहता सर्वांत मोठा गट म्हणून शिंदे गटच आहे असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in