NCP leader Eknath Khadse
NCP leader Eknath KhadseSarkarnama

माझ्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र लढल्याने निसटता पराभव

बोदवड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रीया दिली.

बोदवड : मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रसेचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पॅनेलचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांच्यात छुपी युती होती. मात्र या पराभवाचे चिंतन करू, असे श्री. खडसे यांनी सांगितले.

NCP leader Eknath Khadse
बोदवडकरांचा एकनाथ खडसे नव्हे तर चंद्रकांत पाटलांवर विश्वास

ते म्हणाले, शिवसेनेने बहुमत मिळवल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत निकालावरून दावे प्रतीदावे सुरु झाले आहेत. बोदवडच्या मतदारांचा एकनाथ खडसे नव्हे तर शिवसेना नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास असल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

NCP leader Eknath Khadse
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

बोदवड नगरपंचायतचे निकाल लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर आमचा निसटता पराभव झाला आहे. एक जागा ईश्वर चिठ्ठीने गेली तर एका जागेवर आमचा उमेदवार केवळ सहा मतांनी पराभूत झाला. शेवटी पराभव हा पराभवच आहे. या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती होती. त्यात भाजप नेते गिरीश महाजन आणि स्थानिक आमदारांची चर्चाही झाल्याचे लोकांनी पाहिले आहे. वर्तमानपत्रांत त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करण्याच्या हेतूने सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत होते. परंतु तरीही बऱ्यापैकी यश आम्हाला मिळाले. दुर्दैवाने ईश्वर चिठ्ठीमुळे आम्ही मागे पडलो अन्यथा आम्ही बहुमतापर्यंत पोहोचलो असतो. तरीही हा पराभव का झाला याची कारणमिमांसा करण्याची गरज आहे. त्याचे चिंतन आम्ही निश्चितच करू.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com