`कडवा` पाणी योजना; आमदार कोकाटे आणि वाजे समर्थकांत राजकारण पेटले

शिल्लक साहित्य नगरपरिषदेच्या माथी मारण्याचा डाव असल्याचा कोकाटे समर्थकांचा आरोप.
MLA Manikrao Kokate & Ex MLA Rajabhau Waje

MLA Manikrao Kokate & Ex MLA Rajabhau Waje

Sarkarnama

सिन्नर : शहराची कडवा धरण पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येत आहे. या योजनेतील शिल्लक साहित्याचे पैसे नगरपरिषदेतर्फे ठेकेदाराला अदा करून त्यात मलिदा खाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी केला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार कोकाटे (Manikraon kokate) व माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje-Shivsena) यांच्यातील राजकारणाने डोके वर काढले आहे.

<div class="paragraphs"><p>MLA Manikrao Kokate &amp; Ex MLA Rajabhau Waje</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

कोकाटे समर्थकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कडवा पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र कोनांबे शिवारात सिन्नर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत आहे. आत्ताच ४ ते ५ दिवसापूर्वी टाकलेले मटेरियल आणि यापूर्वीचे या योजनेचे शिल्लक असलेले काही मटेरियल भंगारात विकले जात असल्याची माहिती आमदार कोकाटे समर्थक नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना मिळाली होती.

<div class="paragraphs"><p>MLA Manikrao Kokate &amp; Ex MLA Rajabhau Waje</p></div>
महापालिका बैठकीतील काजू- बदाम कोण ढापतयं?

त्यानुसार आम्ही नामदेव लोंढे, बाळासाहेब उगले, मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, गोविंद लोखंडे, संतोष शिंदे, मेहमुद दारुवाला, अनिल वराडे, अशोक मोरे, पंकज जाधव, सुनील कानडी योजनेच्या ठिकाणी गेलो होतो. त्यात स्वत: माजी नगराध्यक्ष तसेच पालिकेच्या कॉन्ट्रक्ट सिस्टिममधले कर्मचारी तेथे उपस्थित राहून त्यांच्या नगराध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये या वस्तूचे मोजमाप सुर होते. या योजनेतील शिल्लक राहिलेले भंगार मटेरियल भंगाराच्याही भावात कोणी घेणार नाही असे भंगार मटेरियल सिन्नर नगरपालिका स्वीकारुन त्या भंगार मटेरियलचे पैसे संबंधित योजनेचा ठेकेदाराला द्यायचा घाट घातला जात होता.

हे आमच्या निदर्शनास आले तेव्हा तेथे उपस्थितीत असलेल्या सिन्नर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अभियंता दसरे यांना विचारणा केली असता या योजनेचे मटेरियल शिल्लक राहीले आहे. ते आम्ही स्वीकारत आहोत. त्याची किंमत आम्ही विचारली असता अंदाजे दीड कोटी ते दोन कोटी सांगण्यात आली. त्यानंतर आम्ही साहित्याची गुणवत्ताबाबत विचारले असता तपासणीसाठी कोणतीही तज्ज्ञ तांत्रिक पथक नव्हते. जर ठेकदाराने जास्तीचे साहित्य आणले असेल तर त्याच्याशी नगरपालिकेचा संबंध काय ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे साहित्य स्वीकारून बिल द्यावे असे करारत कुठेही उल्लेक नसताना हा उपद्वाप कशासाठी असा प्रश्‍न निर्माण होतो.

या ठेकेदाराचे इतर ठिकाणी सुरु असलेल्या साईडवरील उरलेले भंगार मटेरियल माजी नगराध्यक्षाच्या देखरेखीखाली स्वीकारण्याचे काम तेथे सुरू होते. ते बेकायदेशीर आहे. पाच वर्षाच्या सत्तेनंतरही मलई खाण्याचे काम सुरू असल्याचा आमचा आरोप आहे. स्काडा प्रणाली नवख्या तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. हा सर्व प्रकार राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व नगरसेवक यांनी उघडकीस आणला आहे. संबंधित अभियंता दसरे यांनी वरिष्टांच्या आदेशाने आपण या ठिकाणी आल्याचे सांगितले.

---

नगरपालिकेचे कर्मचारी कडवा पाणी योजनेचे उरलेले साहित्य ते घेत होते. त्यानंतर कोणीतरी विरोधकांना सांगून मी साहित्य घेत असल्याचा आरोप केला. विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. केवळ राजकारण करण्याचे काम सुरु आहे.

- किरण डगळे, माजी नगराध्यक्ष.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com