Nashik News : शिवसेना-'वंचित'ची युती होताच नाशिकमध्ये जल्लोष

Shivsena - VBA Alliance: शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचितच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब
Nashik News
Nashik NewsSarkarnama

Thackeray Group And Vanchit Bahujan Aaghadi Alliance : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे.

शिवसेना (Shiv Sena) व वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा होताच नाशिकमध्ये शिवसैनिक व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला आहे.

नाशिकमधील युवती सेनेच्या उपजिल्हाधिकारी किरण दराडे, बाळा दराडे, भागवत आरोटे माजी नगरसेवक वंचित महानगर प्रमुख अविनाश शिंदे, शाखाप्रमुख विक्रांत सांगळे, ऋषी ताजने, सुमित शिरसाठ, मदन ढेमसे, बालम शिरसाठ, प्रमोद जाचक, राजू गांगुर्डे यांच्यासह शिवसैनिकांनी पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ दोन्ही गटांनी एकत्र येत जल्लोष केला.

Nashik News
Sandipan Bhumre News : मुलाला, नातवाला जमले नाही, ते कडवट शिवसैनिकाने करून दाखवले..

''आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या चाणक्य नीतीचा वापर केला आहे. तसेच जनतेच्या मनातील निर्णय घेऊन 40 गद्दार आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आम्ही नाशिकमधील सर्व शिवसैनिक निर्णयाचे स्वागत करतो. येत्या मनपा निवडणुकीत निश्चित पणे फायदा होईल, मतविभाजन टळेल'', असं मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केलं.

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ''आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

Nashik News
Thackeray-Ambedkar Alliance : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे-आंबेडकर कितपत फलदायी ठरणार?

आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत, असं ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com