राजकारण तापले : शिंदे गटात या नाहीतर.. थेट महापौरांनाच धमकी

जळगाव शहरात माजी मंत्री गुलाबराव पाटील हे सध्या शिंदे गटासाठी आक्रमक
Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi NewsSarkarnama

जळगाव : तुम्ही एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde) या अन्यथा जळगावचा (Jalgaon) विकास रोखण्यात येईल अशी धमकी जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आली आहे. एका नगरसेवकाच्या माध्यमातून हा मेसेज टाकण्यात आला असल्याचे महापौर श्रीमती महाजन (Jayshree Mahajan) यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस सुरू आहे. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करून घेण्यात येत आहेत. जळगावातही काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे याच्या गटात प्रवेश केला आहे.

आज जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी व महापालिकेतील काही नगसेवकांनी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांनी शिवसेनेकडील रुग्णवाहिकाही परत घेतली...

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी म्हटले आहे, धमकी देवून काही जणांचा प्रवेश केला जात आहे. महापौर जयश्री महाजन यांनाही शिंदे गटाच्या एका नगरसेवकाच्या माध्यमातून मोबाईलवर मेसेज टाकून धमकी आली आहे. तुम्ही शिंदे गटात या अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. अशा धमक्यांना आम्ही कोणत्याही प्रकारे भीक घालत नाही असेही सावंत यांनी म्हटले आहे.

याबाबत महापौर जयश्री महाजन यांनीही पत्रकारांशी बोलतांना सांगितले, कि, शिवसेना सोडून तुम्ही शिंदे गटात सहभागी झालात तर जळगावचा विकास होईल, अन्यथा जळगावचा विकास रोखण्यात येईल असे मेसेज आपणास मोबाईलवर येत आहेत. महापालिकेत काही नगरसेवक दुसऱ्या गटाला भेटलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मेसेज आले आहेत आपण जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले तर जळगाव शहराचा विकास अजून चांगल्या पध्दतीने होईल.नाहीतर जळगाव शहराचा विकास थांबविला जाईल कुठे तरी अडचणी निर्माण करण्यात येतील. अशा प्रकारचे मेसेज मला येत आहेत.

Jayshree Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in