बंडखोर आमदारांची राजकीय अस्तित्वासाठी अग्निपरीक्षा सुरु!

कायम राखण्याचे आव्हान; ठाकरे गटाला प्रभाव आजमावण्याची संधी
Chimanrao Patil, Eknath Shinde & Gulabrao Patil
Chimanrao Patil, Eknath Shinde & Gulabrao PatilSarkarnama

सुधाकर पाटील

भडगाव : शिवसेना (Shivsena) आमदारांच्या बंडानंतर राज्यात (Maharashtra) पहिल्यांच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे बंडानंतरही आपले मतदारसंघात अस्तित्व कायम आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्ह्यासह राज्यातील बंडखोर आमदारांसमोर आहे. अर्थात ही त्याच्यांसाठी अग्निपरीक्षाच आहे तर उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या सेनेलाही आपला प्रभाव किती हे आजमावण्याची संधी आहे. (Local Municiple Election will be the political test For shivsena & Rebel)

Chimanrao Patil, Eknath Shinde & Gulabrao Patil
हिंमत असेल तर शिवसेना सोडली हे जाहीर करा!

जिल्ह्यात तब्बल १५ तर राज्यात २०७ नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका या दोघांसाठी चाचणी परीक्षा असल्याचे चित्र आहे.

Chimanrao Patil, Eknath Shinde & Gulabrao Patil
थोडं थांबा, गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत परत येतील?

गेल्या महिन्यात राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाले. शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवेसेनेचे आमदार फुटल्याने राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन केली तर पुन्हा त्यांच्या अंगावर गुलाल पडणार नाही, असे आव्हानही दिले. तूर्तास विधानसभा निवडणुकाना अडीच वर्ष बाकी आहे. मात्र सद्य:स्थितीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे शिवेसेनेच्या दोन्ही गटांना आपले आस्तित्व सिद्ध करण्याची या निमित्ताने संधी आहे.

राज्यात २०७ पालिकांच्या निवडणुकांची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील १५ पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यापैकी ८ पालिका या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांची टक्कर रंजक ठरणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने केव्हाही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांसाठी ताकद दाखविण्यासाठी घोडे मैदान जवळच आले आहे.

मतदार कोणाच्या बाजूने?

शिवसेनेत उभी फूट पडल्याने अंतर्गत कलहाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. बंडखोर आमदारांविरोधात जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. खऱ्या शिवसेनेची ताकद आम्ही दाखवून देऊ. ज्याने शिवसेनेशी गद्दारी केला तो निवडून येत नाही, असे आव्हान दिले गेले. मात्र दुसरीकडे आमदार आपल्या मतदारसंघात दाखल झाल्यावर त्यांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी ते नसतानाही समर्थनार्थ मोठ्या रॅली निघाल्या. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदार कोणाच्या बाजूने, हा खरा प्रश्न आहे.

कार्यकर्ते संभ्रमात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि आम्ही एकत्रित दोनशे आमदार निवडून आणू, असे जाहीर केले. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे दोघांच्या युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तोंडावर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढतील का? शिवसेनेचे चिन्ह कोणाला मिळेल? शिवसेनेचे उमेदवारीचे एबी फार्म कोणाकडे असतील? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना कार्यकर्ते हँग झाले आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि सेनेतच लढाई आहे, अशा पालिकांमध्ये दोघांमध्ये समजोता कसा होईल? हाही तितकाच गंभीर प्रश्न दोघांसाठी आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in